संसदेचं कामकाज सुरळीत करण्यासाठी काँग्रेसनं सूचवला मार्ग
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे संसदीय कामकाजात सतत व्यत्यय येत असताना, कामकाज सुरळीत होण्यासाठी काँग्रेसने बुधवारी मार्ग सुचवला.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी गांधींचा अमेरिकास्थित अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध जोडलेल्या ‘बदनामीकारक टिप्पणी’चा उल्लेख करत, काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून सभागृहाच्या कामकाजातूनही टिप्पणी वगळण्याची मागणी केली आहे.
पक्षाने म्हटले आहे की, अध्यक्षांच्या निर्णयानंतर संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनासाठी सूचीबद्ध केलेल्या संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यास पक्ष इच्छुक आहे.
10 डिसेंबर रोजी बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात, गोगोई म्हणतात, ‘माझ्या 5 डिसेंबर 2024 आणि 6 डिसेंबर 2024 रोजी तुम्हाला लिहिलेल्या माझ्या मागील पत्रांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, खासदार निशिकांत दुबे यांनी नेत्याच्या विरोधात केलेल्या बदनामीकारक टिप्पणीबद्दल आम्ही चिंतित आहोत. 5 डिसेंबर 2024 च्या शून्य तासाच्या प्रहरात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर अभद्र टिका करण्यात आली’.
गोगोई पुढे म्हणतात की, ‘आमच्या तक्रारीची तपासणी करण्याचा आणि सर्व बदनामीकारक आणि असंसदीय टिप्पण्या रेकॉर्डमधून काढून टाकण्याचा तुमचा निर्णय जाहीर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो’.
‘तुमच्या निर्णयानंतर, काँग्रेस पक्ष संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनासाठी सूचीबद्ध केलेल्या संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यास उत्सुक आहे’, असंही ते म्हणाले.
संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी काँग्रेस पक्षं वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार जयराम रमेश यांनी केली आहे. ‘माझे सहकारी आणि लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते, गौरव गोगोई यांनी स्पीकरला पत्र लिहिले आहे. कामकाज पुन्हा सुरू करण्याच्या मार्गाबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. पण मोदी सरकारला दोन्ही सभागृहांचे कामकाज चालवायचे आहे का?’, असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List