पीसीबीला बळीचा बकरा बनवलाय, राशीद लतीफचे आयसीसीवर टीकास्त्र
पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) जे हवे होते ते मिळाले नाहीच. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाच रद्द व्हायला हवी. आयसीसीने पीसीबीला अक्षरशः बळीचा बकरा बनवलाय. त्यामुळे पीसीबीने स्वतःच पुढाकार घेऊन ही स्पर्धाच संपवावी, असे आवाहन पाकिस्तानचा माजी कसोटीपटू राशीद लतीफने केले आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन आयसीसीसाठी डोकेदुखी ठरलीय. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे आणि बीसीसीआय आपला संघ पाठवण्यास तयार नाहीय. त्यामुळे स्पर्धेसाठी सुरू असलेले भांडण सुरूच आहे. स्पर्धा आयोजनबाबत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सारेच चिंतीत आहेत. याचदरम्यान लतीफने पीसीबीला ही स्पर्धाच संपवून टाकावी. बीसीसीआय ना बोलण्याच्या आधी पीसीबीनेच पुढाकार घेऊन स्पर्धाच रद्द करण्याचे पाऊल उचलावे. काहीही झाले तरी आयसीसी ही बीसीसीआयशी पंगा घेऊ शकत नसल्याचा दावा लतीफने केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List