प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा फंडा; तुम्ही फक्त जागा द्या, झाडे आम्ही लावतो!

प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा फंडा; तुम्ही फक्त जागा द्या, झाडे आम्ही लावतो!

मुंबईत वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरू केली असून 2018 पासून आतापर्यंत तब्बल 5 लाख 81 हजार 589 झाडे लावली आहेत. तर आता ‘तुम्ही फक्त जागा द्या, आम्ही झाडे लावतो’ असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाकडून सोसायट्यांना करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक प्रभावी वृक्ष लागवड ठरणार असल्याने उद्यान विभागाकडून आतापर्यंत 68 ठिकाणी झपाटय़ाने वाढणारी मियावाकी वने विकसित करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात हे प्रमाण वाढवण्यात येणार असून वनांसाठी पाच ते सहा ठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी मियावाकी वने आणि झपाटय़ाने वाढणाऱया देशी झाडांची लागवडही करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक तथा वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.

असा आहे उपक्रम

मुंबईमधील सोसायट्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास पालिकेच्या उद्यान विभागाकडून त्या ठिकाणी झाडांची मोफत लागवड करण्यात येईल. यासाठी आवश्यक मनुष्यबळही पालिकेचे असेल. झाडेही मोफत असतील. झाडे लावल्यानंतर फक्त संबंधित सोसायट्यांना झाडांची काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येईल.

मियावाकी वनांचा असा होतो फायदा

मियावाकी वने कमी जागेत आणि कमी वेळेत वाढणारी असून कोकणातील ‘देवराई’शी आणि सिंगापूरसारख्या शहरांमध्ये असणाऱया अर्बन फॉरेस्ट संकल्पनेवर आधारित आहे. या वनांमधील झाडांमध्ये कमी अंतर असल्याने ती घनदाट असतात. मुंबईसारख्या कमी मोकळय़ा जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी ही वने लवकर वाढत असल्याने फायदेशीर ठरतात.

मियावाकीमध्ये ही झाडे लावली जातात

मियावाकी वनांमध्ये चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजिवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरु, बदाम, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब, कढीपत्ता, नारळ, बकुळ, आंबा, निलगिरी यासह फुलझाडे-फळझाडे लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे मियावाकी वनांची संकल्पना जपानी पद्धतीची असली तरी मुंबईत लागवड करण्यात येणारी झाडे ही देशी प्रजातीची आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विलेपार्लेत परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी तरुणाला तुडवले विलेपार्लेत परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी तरुणाला तुडवले
‘रिक्षा देखकर चलाओ’ असे म्हटल्याचा राग आल्याने तिघा परप्रांतीय रिक्षाचालकांनी मराठी तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले येथे...
तामीळनाडूत सात फूट उंचीचा केक
लक्षवेधक – कैलास यात्रेसाठी आता फक्त 16 दिवस लागणार
चीनचे प्रसिद्ध ऍप टिकटॉकवर आता अल्बानियातही बंदी; हे ऍप छोटी मुले आणि समाजासाठी धोकादायक
मुलगी पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांचा प्रवास
जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, पारा घसरला; शाळा, महाविद्यालयांना हिवाळी सुट्ट्या जाहीर
अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड, घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांचे आंदोलन