‘यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा..’; ‘झिम्मा’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

‘यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा..’; ‘झिम्मा’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

गेले महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आज होतंय. त्यापूर्वी मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करून बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपची कोंडी केली. आमदार हितेंद्र ठाकूर आणि बविआच्या कार्यकर्त्यांनी साडेचार तास आक्रमक पवित्रा घेत हॉटेलमध्ये तावडे यांना रोखून धरलं होतं. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत एका खोलीतून 9 लाखांची रोकड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जप्त केली. या सर्व नाट्यमयी घडामोडींवर सोशल मीडियाद्वारे विविध प्रतिक्रिया समोर आल्या. आपली मतं बिनधास्तपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक हेमंत ढोमे याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलेलीच पोस्टसुद्धा चर्चेत आली आहे. ‘यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय.

हेमंतची पोस्ट-

‘निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे ‘विनोद’ नाही गड्या. मंडळी उद्या विचार करून मतदान करा. यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा,’ अशी उपरोधिक पोस्ट त्याने लिहिली आहे. यासोबतच #कोणाचा_गेम_कोणाला_फेम असा हॅशटॅग त्याने दिला आहे. यासोबतच हेमंतने नाशिकमधल्या एका हॉटेलमधून दोन कोटी रुपये जप्त झाल्याच्या बातमीचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं, ‘वाटेंगे तो जितेंगे’.

मंगळवारी सकाळी तावडे विरारमधील विवांता हॉटेलमध्ये काही नागरिकांना भेटण्यासाठी आले होते. याठिकाणी पैसेवाटप होत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले. पैसे दिल्याचा उल्लेख असलेल्या डायऱ्या तसंच पैशांची पाकिटं सापडल्याचा आरोप बविआने केला. घटनेचं गांभीर्य पाहून आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना जाब विचारला. हा गोंधळ सुमारे साडेचार तास सुरू होता. याप्रकरणी विनोद तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि अन्य पदाधिकाऱ्यांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तावडे यांनी सर्व आरोप फेटाळले असून निवडणूक आयोगाने हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Nana Patole : मी तर शेतकऱ्याचा मुलगा, बिटकॉईन काय असतो मला नाही माहित, मतदानाच्या दिवशी वातावरण तापलं Nana Patole : मी तर शेतकऱ्याचा मुलगा, बिटकॉईन काय असतो मला नाही माहित, मतदानाच्या दिवशी वातावरण तापलं
राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. मतदानाच्या एक दिवस अगोदरच मोठे कांड झाले. पैसे वाटपाचा आरोप, उमेदवारांवर हल्ले करण्यात आले....
शिर्डीत मतदानासाठी विद्यार्थ्यांचा वापर?; राज्यात या ठिकाणी पण राडा, मतदान वाढीसाठी कुणाची काय खेळी?
Vinod Tawde : पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना विनोद तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण…
VIDEO : मतदानापूर्वी अमित ठाकरे-सदा सरवणकर समोरासमोर, पुढे काय घडलं?
Raj Thackeray : वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय ते सांगितलं
शाहरुख खानच्या मुलासाठी कंगना रणौतची पोस्ट; म्हणाली, ‘फिल्मी कुटुंबातील मुलं फक्त मेकअप, वजन…’
ए. आर. रेहमान यांची किती आहे संपत्ती, पत्नी सायरा बानू यांनी किती मिळणार पोटगी?