जखमेवर फुंकर मारण्यासाठी यंग इंडिया आफ्रिकेत, चार टी-20 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार
हिंदुस्थानच्या नवोदित खेळाडूंचा संघ नुकताच दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला असून हा संघ आफ्रिकेच्या भूमीवर चार टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. हिंदुस्थानच्या अनुभवी संघाने न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाणी कामगिरी केल्यानंतर आता 8 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत यश मिळवून क्रिकेटप्रेमींच्या जखमेवर फुंकर मारण्याची जबाबदारी यंग इंडियाच्या खांद्यावर आहे. तर दुसरीकडे टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे चवताळलेला आफ्रिकन संघ हिंदुस्थानचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाला आहे.
काल हिंदुस्थानला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0ने हार सहन करावी लागली. या पराभवामुळे हिंदुस्थानी संघाच्या मनावर खोलवर जखमा झाल्या आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे या पराभवानंतर आता हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियामध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी रवाना होतोय. या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. तत्पूर्वी हिंदुस्थानचा नवोदित खेळाडूंचा तगडा संघ चार टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. येत्या शुक्रवारी 8 नोव्हेंबरला सलामीची लढत रंगणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघ उतरणार आहे.
टी-20साठी उभय संघ
हिंदुस्थान : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पंडया, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.
द. आफ्रिका : एडन मार्करम, ओटनिल बार्टमन, जिराल्ड कोत्झी, डोनोव्हन फरेरा, रिझा हेंड्रिक्स, मार्को यान्सन, हेनरिक क्लासन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, नकाबायोमजी पीटर, रायन रिकल्टन, ऑण्डिले सिमेलेन, लुथो सिपामला, ट्रिस्टन स्टब्ज.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
(सर्व सामने रात्री 9.30 वाजता)
पहिला सामना : 8 नोव्हेंबर, डर्बन.
दुसरा सामना : 10 नोव्हेंबर, गकेबेहरा.
तिसरा सामना : 3 नोव्हेंबर, सेंच्युरियन.
चौथा सामना : 15 नोव्हेंबर, जोहान्सबर्ग.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List