चित्रपट येण्याआधीच ‘पुष्पा 2’च्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले; आता 1000 कोटींचा टप्पा पार करणार?
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरला 17 तासांत अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. तेलुगू ट्रेलरला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले असले तरी उत्तर भारतीयही यात मागे नाहीयेत. हिंदी ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रपट येण्याआधीच ट्रेलरलाच मिळालेले एवढे व्ह्यूज आणि पसंती पाहाता चित्रपट 1000 कोटींची कमाई करेल असा अंदाज आता वर्तवला जात आहे.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ने सर्व रेकॉर्ड मोडले
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चा धमाकेदार ट्रेलर 17 नोव्हेंबर रोजी आला आहे. काल म्हणजेच 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5 वाजता पाटणा येथे एक भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रम झाला, त्यानंतर सर्व भाषांचे ट्रेलर यूट्यूबवर आले. ट्रेलरला चाहत्यांची पसंती मिळाली असून अजूनही चित्रपटातला सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.
यूट्यूबवर सर्व भाषांचे ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या क्रमांकावर तेलुगू ट्रेलर आहे, ज्याला अवघ्या 17 तासांत 42 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हिंदी ट्रेलरला 30 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सर्व भाषांमध्ये ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद हा प्रचंड मोठा आहे.
इतकंच नाही तर ‘पुष्पा 2’ चा हिंदी ट्रेलर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या ट्रेलरवर 42 हजारांहून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. आणि हा ट्रेलर 1 मिलियन लोकांनी लाइकही केला आहे. चित्रपटाच्या गाण्याला आणि टीझरलाही असाच प्रतिसाद मिळाला होता. पण ट्रेलरने सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. YouTube वर 40 दशलक्ष व्ह्यूज मिळवणारा हा कदाचितच पहिला ट्रेलर बनला आहे.
ट्रेलरवरून चित्रपट 1000 कोटींचा टप्पा पार करणार?
ट्रेलरमध्ये धमाकेदार व्हिज्युअल, अल्लू अर्जुनचा जबरदस्त परफॉर्मन्समुळे हा ट्रेलर पाहून चाहत्यांच्या अपेक्षा पूर्वीपेक्षा जास्त वाढल्या आहेत. ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहाता चित्रपट मोठे विक्रम मोडीत काढणार असं दिसत आहे. दरम्यान हा चित्रपट पहिल्याच दिवशी 250 कोटींहून अधिक कमाई करेल असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच करोडो रुपयांची कमाई केली असं म्हणायला हरकत नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List