Tabu Net Worth: तब्बूकडे इतक्या घरांचा मालकी हक्क, अभिनेत्रीची संपत्ती थक्क करणारी
Tabu Net Worth: बॉलिवूड अभिनेत्री तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आज अभिनेत्री वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहे. तब्बू बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत देखील अव्वल स्थाना आहे. तब्बू हिने फक्त हिंदी सिनेमांमध्येच नाही तर, तेलुगू आणि तमिळ इंडस्ट्रीमध्येही अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय अभिनेत्रीने हॉलिवूडमध्ये देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
तब्बू हिने वयाच्या 14 व्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. देव आनंद यांच्या ‘नैजवान’ सिनेमातून अभिनेत्री प्रवास सुरु झाला. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज तब्बू हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये तब्बूने स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे.
तब्बू वयाच्या 52 व्या वर्षी एकटीच रॉयल आयुष्य जगते. रिपोर्टनुसार, तब्बू हिची एकूण एकूण संपत्ती 52 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तर अभिनेत्रीचं मासिक उत्पन्न 36 लाख रुपयांपर्यंत आहे आणि वार्षिक उत्पन्न 3 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
सिनेमात भूमिका साकारण्यासाठी तब्बू जवळपास तीन कोटी रुपये घेते. शिवाय अभिनेत्री ब्रांड एंडोर्समेंटसाठी 1 कोटी रुपये घेते. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री कमाई करते. गेल्या काही वर्षांमध्ये तब्बूच्या नेटवर्थमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हैदराबाद याठिकाणी अभिनेत्रीचं आलिशान बंगला आहे. दुमजली बंगला सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. मुंबईत देखील अभिनेत्रीचं स्वतःचं घर आहे. मुंबईतील वांद्रे याठिकाणी अभिनेत्रीचं आलिशान घर आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अभिनेत्रीचे तीन भव्य घर आहेत.
तब्बू हिच्याकडे महागडं कार कलेक्शन देखील आहे. अभिनेत्रीला अनेकदा मर्सिडीज-बेंझ एस-क्लास किंवा ऑडी Q7 मध्ये पाहिलं आहे, ज्याची किंमत 80 लाख रुपये आहे. अभिनेत्रीकडे BMW X5, BMW 7 Series 730Ld आणि टोयोटा फॉर्च्युनर आहे. तब्बूच्या गॅरेजमध्ये काही जुन्या गाड्या पार्क केल्या आहेत, ज्यात 1965 ची फोर्ड मस्टँग आणि क्लासिक मर्सिडीज-बेंझ 220 आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List