पुष्पापासून केजीएफ आणि बाहुबलीपर्यंत, या सिनेमाच्या यशात रविना टंडनच्या पतीचा हात

पुष्पापासून केजीएफ आणि बाहुबलीपर्यंत, या सिनेमाच्या यशात रविना टंडनच्या पतीचा हात

‘पुष्पाच्या दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 17 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आलाय. यावेळी रवीना टंडनचा पती अनिल थडानीही उपस्थित होते. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की अनिल थडानी यांचा ‘पुष्पा 2: द रुल’शी काय संबंध आहे. साऊथचे चित्रपट संपूर्ण भारतात ब्लॉकबस्टर बनवण्याचे श्रेय कुणाला मिळत असेल तर ते अनिल थडानी यांना आहे. ‘पुष्पा: द राइज’, ‘बाहुबली – द बिगिनिंग’, ‘बाहुबली – द कन्क्लूजन’, ‘केजीएफ’, ‘केजीएफ 2’ ते ‘कल्की 2898 एडी’ यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशात रवीना टंडनच्या पतीचा मोठा वाटा आहे.

अनिल थडानी हे चित्रपट वितरक आहेत. त्यांची कंपनी AA  ही दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या उत्तर भारतीय राज्यांच्या बाजारपेठांमध्ये चित्रपटांचे वितरण आणि प्रतिनिधित्व करते. थडानी यांनी 1994 मध्ये आलेल्या ‘ये दिलगी’ या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. 2015 पासून, ते दक्षिणेकडील चित्रपटांच्या हिंदी डब आवृत्त्या वितरित करत आहे.

अनिल थडानी यांचा पहिला साऊथ चित्रपट एसएस राजामौलीचा ‘बाहुबली – द बिगिनिंग’ होता. हा चित्रपट संपूर्ण भारतात हिट ठरला आणि तेव्हापासून थडानी सतत दक्षिणेतील चित्रपट यशस्वी करत आहे. मात्र, त्यांचे ‘आदिपुरुष’ आणि ‘देवारा – पार्ट वन’ हे दोन दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले.

रवीना टंडन आणि अनिल थडानी यांचा २००३ साली साखरपुडा झाला होता. यानंतर 2004 मध्ये या जोडप्याने उदयपूरला विवाह केला. या जोडप्याच्या लग्नाला आता 20 वर्षे झाली आहेत आणि ते राशा थडानी आणि रणबीर वर्धन या दोन मुलांचे पालक आहेत. त्यांची मुलगी राशा लवकरच ‘आझाद’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतांसाठी महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर कारवाई होणार का? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल मतांसाठी महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर कारवाई होणार का? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
महाराष्ट्रात सोमवारी विधानसभआ निवडणुकांचा प्रचार थंडावला आहे. या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि एक है सेफ है असे नारे देत...
चित्रपट येण्याआधीच ‘पुष्पा 2’च्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले; आता 1000 कोटींचा टप्पा पार करणार?
पुष्पापासून केजीएफ आणि बाहुबलीपर्यंत, या सिनेमाच्या यशात रविना टंडनच्या पतीचा हात
रोज एक अंड खाल्ल्याचा आहे चत्मकारीक फायदा, संशोधनातून समोर आली मोठी गोष्ट
International Mens Day 2024 : पुरुषांना असतो या 5 आजारांपासून धोका ? वेळीच व्हा सावध
अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक, देशमुख जखमी
Video – महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठी राज्याला जिंकवावेच लागेल; आदित्य ठाकरे यांची गर्जना