‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?

‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीत जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते पंकजा मुंडे यांचा उल्लेख करत आभार मानले. त्यावर पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “जे संजय राऊत बोलले की, 23 तारखेला आपण जिंकणार आहोतच आणि राज्यभर फटाके फुटणार आहेत. पण जर महाझुटी जिंकली तर गुजरातला फटाके वाजतील. मी सगळ्या गुजराती वर्गाला आणि व्यापारी वर्गाला दोषी धरत नाही. पण पंकजा मुंडे काल बोलल्या आहेत. तो व्हिडीओ सुद्धा आहे. मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे आहेत. पंकजा ताई तू फार मोठं काम केलंस, आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी तू काढलीस. जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्याय देवतेच्या डोळ्यांवरची पट्टी काढली आणि स्वत: च्या डोळ्यांवर बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यांवरची पट्टी काढली आहे”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

“पंकजा मुंडे यांनी काय सांगितलं आहे की, भाजपचं काम म्हणजे त्यांचे शब्द वेगळे आहेत. मी तुम्हाला त्याचा फक्त अर्थ सांगतो. भाजपचं काम लय भारी असतं बघा. आपल्याकडे बुथ किती आहेत? तर 90 हजार. प्रत्येक बुथवरती भाजपचं दक्षता पथक आहे. पथक म्हणजे एक पेक्षा अधिक माणसं. एक माणूस जरी धरला तरी 90 हजार बुथवर 90 हजार माणसं. 2 धरली तर 1 लाख 80 हजार, 3 धरती तर त्याच्या पटीत. सगळी माणसं गुजरातमधून भाजपने इकडे महाराष्ट्रात आणली आहेत, म्हणजे आपल्यावर नजर ठेवायला. ते आज नजर ठेवायला आले आहेत, उद्या त्यांचा आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा डाव आहे. हे तर फेक नरेटिव्ह नाही ना? हे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलत आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘बॅग कंपनीचा मला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनवा’

“याचा अर्थ असा की, इथे भाजप हरलेली आहे. इथे भाजप राहिलेली नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या भाजप प्रेमींवर भाजप नेतृत्वावर विश्वास नाही. मग तो मराठी माणसावर नाही, गुजरातीवर नाही, उत्तर भारतीयांवर नाही. कुणावरच नाही. ते आता परराज्यातून माणसं आणून नजर ठेवत आहेत. मी अनेक वेळा निवडणुका बघितल्या. अनेक निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरलेलो आहे. पण या निवडणुकीत किमान दोन ते तीन वेळा माझी बॅग तपासली गेली आहे. खरं म्हणजे त्या बॅगच्या कंपनीला पत्र लिहिणार आहे की, तुमच्या बॅग कंपनीचा मला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनवा. बँड अ‍ॅम्बेसिडर उद्धव ठाकरे. बॅग हो तो ऐसी हो, सबको लगे इसे चेक करो”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“माझी बॅग तपासली, हरकत नाही. पण हे जे लोकं बॅग तपासत आहेत, ते रात्री राहतात कुठे? त्यांचा खर्च कोण करतोय? ते ज्या बॅगा घेऊन फिरत आहेत त्या बॅगेतील ढोकळे आणि शेव-पापड्या कुठून आणले आहेत? कोणासाठी फिरत आहेत, कुणाला काय वाटत आहेत? याआधीच्या निवडणुकांमध्ये मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी बाहेरच्या राज्यातील फौज अद्याप आणलेली नव्हतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

50 खोके एकदम ओके असे म्हणणारे महायुतीचे सरकार पायउतार होईल, मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास 50 खोके एकदम ओके असे म्हणणारे महायुतीचे सरकार पायउतार होईल, मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास
आम्हीं देखील खूप निवडणुका केल्या आहेत.राज्यस्तरावरील निवडणुकांसाठी कधी आम्ही गेलो नाही.पण महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येथे पंतप्रधान आले....
हवामान बदलल्याने होऊ शकतो सर्दी-खोकल्याचा त्रास, आरोग्याची काळजी घेण्यासाठी या घरगुती टिप्स करा फॉलो
महाविकास आघाडीच्या भक्कम साथीने विजयाची पताका घेऊन विधानसभेत जाणार – संजय कदम
मणिपूरातील भाजपच्या बिरेन सिंग सरकारला धक्का; NPP ने पाठिंबा काढला
Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप
Uddhav Thackeray : “मिंध्या तु मर्दाची औलाद असलास…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना भरसभेत आव्हान
‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?