श्रीनगरमध्ये चकमकीत लश्करचा टॉप कमांडर ठार, सुरक्षा दलाचे चार जवान जखमी
श्रीनगरमध्ये खानयार परिसरात शनिवारी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार झाला. यात सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले. खानयार भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यात आला. याला जवानांनी प्रत्युतर दिले.
चकमकीदरम्यान ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, त्या घराला आग लागली. चकमकीत लश्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात दोन पोलीस आणि दोन जवान जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी लष्कराच्या 92 बेस रुग्णालयात नेण्यात आले. चौघांचीही प्रकृती आता स्थिर असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
उस्मान असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. उस्मान बराच काळ काश्मीर खोऱ्यात सक्रिय होता. तसेच अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. इन्स्पेक्टर मसरूर वाणी यांच्या हत्येतही उस्मानचा हात होता. उस्मानचा मृत्यू हा जम्मू आणि काश्मीरमधील एलईटीसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List