“महिला, रोजगार आणि…”, मनसेच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख मुद्दे काय?

“महिला, रोजगार आणि…”, मनसेच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख मुद्दे काय?

MNS Raj Thackeray Manifesto : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 चा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी या लढतीसह मनसेही मैदानात उतरली आहे. महाराष्ट्रात मनसेने 125 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत जाहीरनामा प्रसिद्ध केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ”आम्ही हे करु” या नावाने हा जाहीरनामा आहे. या जाहीरनाम्यात चार महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महिला, तरुण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासन देण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना चार कलमी कार्यक्रम प्रसिद्ध केला. राज ठाकरे म्हणाले, पहिले सेक्शन आहे, त्यात मूलभूत गरजा आणि जीवनमान आहे. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. पुढच्या सेक्शनमध्ये दळणवळण, पाण्याचं नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट आहे.  तिसरा सेक्शन, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे आहे. यानंतर चौथा मुद्दा हा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन इत्यादी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मनसेच्या जाहीरनाम्यातील प्रमुख 10 मुद्दे

1. मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
2. दळणवळण वीज पाण्याचे नियोजन
3. सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग
4. राज्याची औद्योगिक प्रगती
5. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार
6. गडकिल्ले संवर्धन
7. कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास
8. राज्याचे करत धोरण सुधारणार
9. डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन
10. घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार का? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत देत सांगितले, राजकारणात… उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार का? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत देत सांगितले, राजकारणात…
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणुकीनंतरचे समीकरण कसे असणार? त्यावर चर्चा होत...
“छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा…”, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले
“महिला, रोजगार आणि…”, मनसेच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख मुद्दे काय?
मृणाल दुसानिसचं 4 वर्षांनंतर मालिकेत पुनरागमन; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये कलाकारांची फौज
सोशल मीडियाची ताकद; व्हायरल चहावाल्याचं पालटलं नशीब, शार्क टँकमध्ये मिळाली मोठी ऑफर
पलक तिवारी होणार सैफ अली खानची सून? इब्राहिमबद्दल म्हणाली, ‘मला तो आवडतो आणि…’
सुबोध भावे-तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला