Nawab Malik : अजित पवारांनी सांगितलं उमेदवारी मागे घ्या, तर?, वाचा नवाब मलिकांच उत्तर

Nawab Malik : अजित पवारांनी सांगितलं उमेदवारी मागे घ्या, तर?, वाचा नवाब मलिकांच उत्तर

महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजपाचा नवाब मलिक यांना विरोध आहे. त्यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला जातो. याच मुद्यावर त्यांना TV9 मराठीने प्रश्न विचारले. किरीट सोमय्या, आशिष शेलार तुमच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीचा प्रचार करणार नाही, असं महायुतीकडून म्हटलं जातय. “असे आरोपी कोणी करत असेल, तर मी नोटीस पाठवली आहे, पाठवणार आहे. काही मोठ्या वर्तमानपत्रांनी अशा बातम्या दिलेल्या पण ते आता थांबले आहेत” असं नवाब मलिक म्हणाले.

“माझ्यावर दाऊदशी संबंध असल्याचे जे आरोप करतात, त्यांच्यावर मी न्यायिक कारवाई करणार आहे. असे आरोप करणाऱ्य़ांविरोधात मी न्यायालयात जाणार. त्यांच्यावर खटला दाखल करणार. हे सर्व बिनबुडाचे आरोप आहेत. त्यांच्याविरुद्ध खटला दाखवल करणार. माझ्यावर मनी लॉन्ड्रीगचे आरोप झालेले. कितीही मोठा नेता असला, तरी मी कायदेशीर कारवाई करणार” असं नवाब मलिक म्हणाले.

‘मी आग्रह धरत नाही की, तुम्ही प्रचाराला या’

देवेंद्र फडणवीस म्हणतात, आशिष शेलारांची जी भूमिका, तीच माझी भूमिका. त्यावर नवाब मलिक म्हणाले की, “नका करु माझा प्रचार. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे. मी आग्रह धरत नाही की, तुम्ही प्रचाराला या. जे दाऊदशी माझं नाव जोडतात, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार”

अजित पवारांनी सांगितलं उमेदवारी मागे घ्या, तर?

शिवाजीनगर-मानखुर्दमधून तुम्ही दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. एक अपक्ष आणि दुसरा राष्ट्रवादीच्या तिकीटावर, उद्या अजित पवारांनी तुम्हाला घड्याळावरील अर्ज मागे घ्या, असं सांगितलं, तर तुम्ही ऐकणार का? त्यावर नवाब मलिक म्हणाले की, “तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. आता कोणी उमेदवारी मागे घेऊ शकत नाही. तो अधिकार माझा आहे. कोणी सांगितलं हा आमचा उमेदवार नाही, तर तशी परिस्थिती होऊ शकत नाही. राष्ट्रवादीनेच मला एबी फॉर्म दिलाय. माझ्यावर विश्वास टाकला आहे. भाजपा विरोधात असली, तरी मी एनसीपी म्हणून निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी
1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 रुपये वसूल करणार, अशी दमबाजी कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी...
पुण्यात पोलिसांनी जप्त केलेले 5 कोटी गेले कोठे? युवक काँग्रेसचा सवाल
मोदीजी, महाराष्ट्रात तुमची नाही, फक्त ठाकरेंची गॅरंटी चालते! उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा, भाजपवर जोरदार हल्ला
वांद्रे पूर्व – पुनर्विकासाचा प्रश्न निर्णायक ठरणार
महाराष्ट्राला गुजराष्ट्र, अदानीराष्ट्र करण्याचा भाजपचा डाव; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
जीवनदायी सेवाकार्याला एक तप पूर्ण, बाळासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान उपक्रम
महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मोदी युगाचा अस्त होईल, शरद पवार यांचे भाकीत