नेपाळने चीनला दिले नोटा छापण्याचे कंत्राट, नोटांवरील नकाशात हिंदुस्थानचा भाग; 35 वर्षांपासून वाद सुरू
नेपाळची मध्यवर्ती बँक नेपाळ राष्ट्र बँकने 100 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी एका चिनी कंपनीला कंत्राट दिले आहे. विशेष म्हणजे या नोटांवरील नकाशात हिंदुस्थानातील लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी हा भाग नेपाळचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे. या क्षेत्रावरून हिंदुस्थान आणि नेपाळमध्ये सुमारे 35 वर्षांपासून वाद सुरू आहे. आता नेपाळने चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट दिल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चीनच्या बँक नोट प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन या कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनी नेपाळी चलनी नोटांच्या तब्बल 30 कोटी प्रती छापणार आहे. यासाठी सुमारे 75 कोटी हिंदुस्थानी रुपये खर्ची पडणार असून 100 रुपयांची 1 नेपाळी नोट छापण्यासाठी सुमारे 2.50 हिंदुस्थानी रुपये मोजावे लागणार आहेत. नेपाळच्या मंत्रिमंडळाने या वर्षीच्या मे महिन्यात नोटेच्या डिझाइनमध्ये बदल करण्यास मंजुरी दिली होती. त्यावेळी पुष्प कमल दहल प्रचंड नेपाळचे पंतप्रधान होते.
n नेपाळने 18 जून 2020 रोजी देशाचा नवीन राजकीय नकाशा जारी केला होता. यात पुन्हा लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी नेपाळचा भाग दाखवण्यात आला होता. त्यासाठी नेपाळच्या राज्यघटनेतही बदल करण्यात आले. तेव्हा हिंदुस्थान सरकारने नेपाळच्या या पावलाला एकतर्फी म्हणत विरोध केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List