जुही चावलाची वादग्रस्त पोस्ट, ‘एखाद्या गटारात राहतोय असं…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

जुही चावलाची वादग्रस्त पोस्ट, ‘एखाद्या गटारात राहतोय असं…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Juhi Chawla Social media Post: बॉलिवूड सेलिब्रिटी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. पण अनेकदा सेलिब्रिटींची पोस्ट वादग्रस्त ठरते. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री जुही चावला हिने मुंबई शहर आणि मुंबईतील हवेत असणाऱ्या दुर्गंधीविषयी पोस्ट केली होती. पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. मुंबई शहराबद्दल वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. शिवाय राजकीय वर्तुळामधूनही अभिनेत्रीला टीका सहन करावी लागली होती.

जुही चावला हिने 22 ऑक्टोबर 2022 मध्ये एक ट्विट केलं होतं. ट्विटमध्ये अभिनेत्रीने हवेत असणाऱ्या दुर्गंधीविषयी स्वतःचं मत मांडलं होतं. पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘कोणाच्या लक्षात आलं आहे का? मुंबईतील हवेत दुर्गंधी आहे. पूर्वी वास खाडीजवळून (वरळी आणि वांद्रा, मिठी नदीजवळ नेहमी अस्वच्छ प्रदूषित असणारे जलकुंभ) गाडी चालवताना हा वास यायचा.’

 

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘पण आता हे चित्र पूर्ण दक्षिण मुंबईत आहे. एक विचित्र रासायनिक प्रदूषित हवा शहरात आहे. दिवस – रात्र एखाद्या गटारात राहत आहोत असं वाटत आहे…’ अशी पोस्ट अभिनेत्रीने केली होती. ज्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं. एवढंच नाही तर, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील तेव्हा यावर प्रतिक्रिया दिली होती.

 

 

एका कार्यक्रमात उपस्थित राहात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, ‘प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींनी असं वक्तव्य करण्यापूर्वी एकदा तरी विचार करायला हवा… मुंबईबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणं चुकीचे आहे. ‘ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

जुही चावला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सिनेमांमध्ये गेल्या वर्षांपासून सक्रिय नसली तरी जुही चावला भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर जुही चावलाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा… निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा…
मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी...
‘यावेळी मी स्वतःच नंदेकडे दिवाळीच्या फराळाचा डबा घेऊन गेले कारण..’, महागाईवरून सुप्रिया सुळेंचा सरकारला खोचक टोला
अक्षय कुमारचा 2025 मध्ये धुमाकूळच; 7 चित्रपट लागोपाट येणार; हॉरर, कॉमेडीसंग अॅक्शनचा तडका!
घरातील मोठी माणसं तुम्हाला अन्न चावून खाण्याच्या सल्ला देतात, जाणून घ्या त्याचे ५ जबरदस्त फायदे
मधुमेहाच्या रुग्णांनी न्याहारीमध्ये करावा ‘या’ ४ गोष्टींचा समावेश, शुगर लेव्हल राहील नियंत्रित
हिवाळ्यात ‘या’ 5 खाण्यापिण्याच्या सवयी टाळा, निरोगी आयुष्य जगा
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त