लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भोजपुरी लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन झालं आहे. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात शारदा सिन्हा यांनी अखेरचा श्वास घेतला. शारदा सिन्हा यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या गोड आवाजाने चाहत्यांचं मन जिंकणाऱ्या शारदा सिन्हा चाहत्यांना रडवून गेल्या आहे. शारदा सिन्हा यांनी त्यांच्या आवाजाने अनेकांचं मनोरंजन केलं. आता शारदा सिन्हा त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जिवंत असणार आहेत.
शारदा सिन्हा यांच्या मुलाने आईच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. शारदा यांच्या मुलाचं नाव अंशुमन सिन्हा असं आहे. अंशुमन सिन्हा आईचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, ‘तुमच्या प्रार्थना आणि प्रेम सदैव आईसोबत असेल. छठी मैयाने आईला स्वतःकडे बोलावले आहे. आई आता शारीरिकदृष्ट्या आपल्यात नाही.’ सध्या अंशुमन याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बुधवारी सकाळी शारदा सिन्हा यांचे पार्थिव दिल्लीहून पाटणा येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे अंत्यसंस्कार पाटणा येथे होणार आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबिय शारदा सिन्हा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त
लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्सवर शारदा यांच्यासोबत फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन झाल्यामुळे फार दुःख झालं आहे. त्यांनी गायलेली मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत.
सुप्रसिद्ध लोक गायिका शारदा सिन्हा जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनके गाए मैथिली और भोजपुरी के लोकगीत पिछले कई दशकों से बेहद लोकप्रिय रहे हैं। आस्था के महापर्व छठ से जुड़े उनके सुमधुर गीतों की गूंज भी सदैव बनी रहेगी। उनका जाना संगीत जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। शोक की इस… pic.twitter.com/sOaLvUOnrW
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2024
पुढे मोदी म्हणाले. शारदा सिन्हा यांचं निधन म्हणजे संगीत जगताची कधीही भरून न येणारी हानी आहे. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह माझ्या संवेदना आहेत. ओम शांती…’ अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List