कारले कोणी खाऊ नये? कारल्यात अनेक औषधी गुणधर्म, पण या लोकांसाठी…
टाईप 1 डायबिटीज असलेल्या लोकांनी कारल्याच्या भाजी किंवा कारल्याचा रस पिणे चांगले नाही. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते. ज्यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येण्याची तक्रार होऊ शकते.
गरोदर महिलांनीही कारल्याचे सेवन टाळावे. कारण त्याचा गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो. तसेच गर्भातील बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सलेट असते, त्यामुळे जे लोक त्याचे सेवन करतात त्यांना किडनी स्टोनची समस्या असू शकते. तसेच कारल्यामुळे किडनीमध्ये विषारीपणा वाढतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List