आम आदमी पक्षाकडून दुसरी यादी जाहीर, अवध ओझा यांना उमेदवारी
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 20 उमेदवारांचे नाव आहे. पक्षात नव्यानेच सामील झालेले अवध ओझा यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मनीष सिसोदिया ज्या मतदारसंघातून निवडून आले होते, त्या मतदारसंघातून ओझा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ओझा यांना पटपडगंज तर मनीष सिसोदिया यांना जंगपुरा इथून उमेदवारी देण्यात आली आहे.
शिक्षा सेवा का साधन है।
मैं आभार प्रकट करता हूं आम आदमी पार्टी के राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल जी का जिन्होंने मुझ जैसे सामान्य शिक्षक पर भरोसा किया और मौका दिया।
पटपड़गंज से सिसोदिया जी का शिक्षा संकल्प जारी रहेगा
भाई मनीष सिसोदिया जी का शिक्षा के प्रति अतुलनीय योगदान… pic.twitter.com/LQpsVqiHuv
— Avadh ojha (@kafiravadh) December 9, 2024
याशिवाय आपने नरेलातून दिनेश भारद्वाज, तिमारपूरहून सुरेंद्र पाव सिंह बिट्टू, आदर्श नगरहून मुकेश गोयल, मुंडकाहून जसबीर कारला, मंगोलपुरीहून राकेश जाटव तर चांदनी चौकातून पुनरदीप सिंह साहनी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रवेश रतन आणि जितेंद्र सिंह शंटी हे भाजप सोडून आपमध्ये सामील झाले होते. पक्षाने त्यांनाही उमेदवारी दिली आहे. प्रवेश रतन यांना पटेल नगर तर जितेंद्र सिंह यांना शाहदरातून उमेदवारी देण्यात आली आहे.
फिर लायेंगे केजरीवाल
दिल्ली विधानसभा चुनावों के लिए आम आदमी पार्टी ने आज अपनी दूसरी लिस्ट जारी की है।
इस लिस्ट में 20 विधानसभाओं से पार्टी के उम्मीदवारों के नाम का एलान किया गया है
इस तरह AAP ने अब तक 31 उम्मीदवारों का एलान कर दिया है@AapKaGopalRai pic.twitter.com/O5GNyzK3U5
— AAP (@AamAadmiParty) December 9, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List