निवडणूक आली की भाजपाचे नेते हिंदू मुस्लीम करतात, नाना पटोले यांची टीका
निवडणूक आली की भाजपाचे नेते हिंदू मुस्लीम करतात, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
नाना पटोले म्हणाले की, जेव्हा निवडणूक येते, तेव्हा भाजपाने नेते हिंदू मुस्लीम करतात. मात्र जेव्हा ईद येते, त्यावेळी हेच नेते मुस्लिमांकडे जाऊन बिर्याणी खातात. त्यामुळे या पद्धतीच्या चर्चा आता भाजपाच्या नेत्यांनी थांबवल्या पाहिजे. त्यांनी हिंदू-मुस्लीम करून महाराष्ट्राची एकता तोडू नये.
दरम्यान, जीएसटीवरून नाना पटोले यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, जीएसटी कायद्यात शेतकऱ्यांचा सहभाग काय, असा प्रश्न मी मोदीजींना विचारला होता. माझा शेतकरी उत्पादक असेल तर त्याला पैसे मिळाले पाहिजेत, ही माझी भूमिका होती. शेतकरी जितकं खरंच कार्टी, त्याबदल्यात त्याला काय मिळतं, असं कधीही विचारलं जात नाही. मी स्वतः एक शेतकरी आहे आणि मला शेतकऱ्याला कशात किती सूट मिळते याची चांगली कल्पना आहे. त्यामुळे आम्ही भाजपच्या जीएसटी कायद्याच्या विरोधात आहोत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List