रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्त करू नका, नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र

रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्त करू नका, नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र

वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नव्हता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत तात्पुरती नियुक्ती असा आदेश काढलेला आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर, चुकीचा पायंडा पाडणारी व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी ठरेल. राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पोलीस सेवेत घेऊ नये यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल यांना पत्र पाठवून केली आहे.

राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे लिहितात की, रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना पदावरून हटवले आहे. परंतु त्यांना पुन्हा पोलीस महासंचालक पदी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आल्याने निवडणूक आयोगालाही या प्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी पत्र पाठवले आहे. परंतु अद्याप त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रकरणी राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करावा असे, पटोले यांनी म्हटले आहे.

रश्मी शुक्ला यांना निवडणुकीनंतर पुन्हा डीजीपीपदी नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा काही इरादा असेल, तर तो कायदेशीर व प्रशासकीय गुंता निर्माण करणारा ठरू शकतो. सशर्त अटीमुळे पोलीस महासंचालकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करणारा ठरतो. निवडणूक काळापुरता पोलीस महासंचालक व निवडणुकीनंतरचा पोलीस महासंचालक अशा नियुक्तीमुळे प्रशासकीय संबंधित मूलभूत घटनात्मक तत्त्वे, पदानुक्रम आणि अधिकाराचे पृथक्करण यावर परिणाम होतो. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलनाला बाधा पोहचून कायदेशीर अनिश्चितता उद्भवू शकते. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करावा, असे नाना पटोले यांनी या पत्रात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दापोली विधानसभा मतदारसंघात 875 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा अधिकार दापोली विधानसभा मतदारसंघात 875 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा अधिकार
दापोली विधानसभा क्षेत्रात गृह मतदानाची प्रक्रिया दिनांक 14 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पार पडली. दिव्यांग आणि...
अच्छे दिन दहा वर्षात आलेच नाहीत, मोदी खोटारडे पंतप्रधान; सिद्धरामय्या यांचा घणाघात
ठाण्यात खोक्याच्या केंद्रबिंदूच्या बुडाला मशाल लावल्यावर महाराष्ट्र गद्दारमुक्त होणारच; उद्धव ठाकरे यांची गर्जना
महाराष्ट्राची लूट थांबवणार आणि दिलेली वचनं आपण पूर्ण करणारच; उद्धव ठाकरे यांचा निर्धार
हिवाळ्यात प्रदूषणाचा सर्वाधिक धोका का वाढतो? हवेत काय होतात बदल? जाणून घ्या
दूध, दही की चीज? जाणून घ्या सर्वाधिक प्रोटीन कशामध्ये आहे…
Video – बारामतीत सुप्रिया सुळेंची सभा आजीबाईने गावरान भाषणाने गाजवली