वजन कमी होत नाहीए? या चूका टाळा; आहारतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
वजन कमी करण्यासाठी लोक वेगनेगळ्य़ा प्रकारच्या उपाय करतात. वजन कमी करण्यासाठी डाएटिंग केले जाते. मात्र व्हिडीओ पाहून योग्य माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा लोक डायटिंगच्या नावाखाली पौष्टिक खाद्यपदार्थांपासून दूर राहतात. अनेक जण फक्त एकवेळेच अन्न खातात किंवा काही तर संपूर्ण जेवणच सोडून देतात. मात्र या सवयींमुळे वजन कमी होणे तर दूरच मात्र आजारांना निमंत्रण मिळते.
वजन कमी करण्यासाठी जेवण सोडणे शरिरासाठी घातक ठरू शकते. याबाबत अनेक तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
दररोजच्या आहारातून जेवण वगळल्याने वजन कमी होत नाही तर त्यामुळे आम्लपित्त, बद्धकोष्ठता, सूज येणे किंवा डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे शरिरातील ताकद कमी होते, असे आहारतज्ज्ञांनी सांगितले.
वजन कमी करण्यासाठी जंक फूड खाणे प्रामुख्याने टाळावे. जर तुम्हाला त्वरीत वजन कमी करायचे असेल तर तुमच्या जेवणाच्या वेळा बदलणे आवश्यक आहे. अवेळी अन्न खाल्याने अपचनाचा त्रास उद्भवतो. त्यामुळे तुम्ही सर्व जेवण योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य फूड कॉम्बिनेशनसह घेतले पाहिजे. तरच वजन कमी होण्यास मदत होईल.
जास्त वेळ झोपल्यामुळे देखील वजन वाढू शकते. जर तुम्ही उशिरा उठत असाल आणि रात्री उशिरा फ्रीज उघडून खात असाल तर वजन वाढेलच. कारण तुम्ही जास्त कॅलरी खात आहात. दुसरं कारण म्हणजे तुमची झोप कमी असेल तर तुमच्या शरीरातील संप्रेरकांच्या पातळीतील बदल होण्याने भूक वाढणे आणि खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटत नाही असे होऊ शकते. यासाठी योग्य झोप नसेल तर आपले वजन वाढू शकते किंवा ते कमी होत नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List