घडामोडींना वेग… राज ठाकरेंच्या भेटीसाठी श्रीकांत शिंदे ‘शिवतीर्था’वर; मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन की आणखी काही… चर्चांना उधाण

घडामोडींना वेग… राज ठाकरेंच्या भेटीसाठी श्रीकांत शिंदे ‘शिवतीर्था’वर; मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन की आणखी काही… चर्चांना उधाण

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘शिवतीर्था’वर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र ही भेट माहीम विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात असून, यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून या मतदारसंघातून सदा सरवणकर हे निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेनं माघारी घ्यावी, यासाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

माझं आणि या मतदारसंघाचं नात हे आई आणि मुलाखारखं आहे, त्यामध्ये खंड पडू देऊ नका. मला मुख्यमंत्र्यांचा आर्शीरवाद आहे, आर्शीरवादाशिवाय एबी फॉर्म मिळत नसतो. मला महायुतीचा संपूर्ण पाठिंबा आहे. मी भेटण्यासाठी राजसाहेबांकडे वेळ मागितला आहे. त्यांनी वेळ दिल्यानंतर मी त्यांची भेट घेणार आहे. मला खात्री आहे, की ते मला आर्शीरवाद देतील अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली आहे.

दरम्यान याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरवणकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. महायुतीशी चर्चा न करता राज ठाकरे यांनी आपला उमेदवार उभा केल्यानं हा घोळ झाला आहे. सरवणकर यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी आक्रमक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल तुटायला नको असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आज राज ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे, या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा  झाली? हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राची लूट थांबवणार आणि दिलेली वचनं आपण पूर्ण करणारच; उद्धव ठाकरे यांचा निर्धार महाराष्ट्राची लूट थांबवणार आणि दिलेली वचनं आपण पूर्ण करणारच; उद्धव ठाकरे यांचा निर्धार
डोंबिवलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी मिंधे आणि भाजपवर आसूड ओढले. भाजपचे...
हिवाळ्यात प्रदूषणाचा सर्वाधिक धोका का वाढतो? हवेत काय होतात बदल? जाणून घ्या
दूध, दही की चीज? जाणून घ्या सर्वाधिक प्रोटीन कशामध्ये आहे…
Video – बारामतीत सुप्रिया सुळेंची सभा आजीबाईने गावरान भाषणाने गाजवली
शरद पवारांच्या नावावर मते मागून त्यांनी स्वार्थासाठी गद्दारी केली, त्या ग‌द्दारीला गाडून टाका: अमोल कोल्हे
रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्त करू नका, नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र
महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही, आम्ही शपथ घेऊन उतरलोय; उद्धव ठाकरे कडाडले