राहुल गांधींचे हेलिकॉप्टर झारखंडमध्ये 2 तास रोखून धरले, मोदींच्या सभेमुळे एटीसीने परवानगी नाकारली

राहुल गांधींचे हेलिकॉप्टर झारखंडमध्ये 2 तास रोखून धरले, मोदींच्या सभेमुळे एटीसीने परवानगी नाकारली

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागामा येथे आयोजित प्रचारसभेसाठी आलेल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोड्डा येथील बेलबड्डा येथे तब्बल 2 तास अडकून राहावे लागले. त्यांच्या हेलिकॉप्टरला एटीसी अर्थात हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने उड्डाणासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे राहुल गांधी हेलिकॉप्टरमध्येच बसून होते. या वेळी राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा कर्मचारीही हेलिपॅडभोवती सुरक्षा कडे करून उभे होते.

राहुल गांधी यांना महागामा येथून बोकारो येथील बर्मो येथे जायचे होते. त्या ठिकाणी प्रचारसभा होणार होती.  झारखंडमधील चकाई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे राहुल गांधी यांना सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर भाजपा इंडिया आघाडीला इतके का घाबरत आहे? अशा शब्दांत सोशल मीडियावरून मोदी सरकारवर टीकेचा भडीमार सुरू झाला. दरम्यान, काँग्रेसनेही राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर रोखून धरल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधानांची सभा देवगढ येथे होती. त्यामुळे येथून जाण्यासाठी राहुल गांधी यांना परवानगी नाकारण्यात आली. प्रोटोकॉल समजू शकतो, परंतु काँग्रेसने इतकी वर्षे राज्य केले त्या काळात अशी घटना कोणत्याही विरोधी पक्षनेत्यासोबत घडली नाही. त्यामुळे हे मान्य नाही, असे काँग्रेसने म्हटले.

मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड

झारखंडमधील देवघर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुपारी 2 वाजून 20 मिनिटांपर्यंत ते देवघरमध्येच अडकून पडले होते. त्यानंतर मोदींसाठी दिल्लीहून दुसरे विमान पाठवण्यात आले. मोदी सकाळी याच विमानाने देवघरला आले होते. येथून ते बिहारमध्ये जमुई आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांना देवघरहून दिल्लीला जायचे होते, परंतु विमान टेक ऑफ होऊ शकले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजित पवार यांच्या पक्षातील उमेदवार भाजप नेत्यांवर कायदेशीर कारवाईच्या तयारीत, म्हटले… अजित पवार यांच्या पक्षातील उमेदवार भाजप नेत्यांवर कायदेशीर कारवाईच्या तयारीत, म्हटले…
महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहे. भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तसेच महायुतीमध्ये इतर छोटे...
उद्धव ठाकरे यांच्या सभेला भाजप उमेदवाराच्या शुभेच्छा, ठाकरेंच्या सभेपूर्वी भाजपचे…
सलमान पासून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे करणारा आरोपी लॉरेन्सच्या निशाण्यावर, नव्या हिटलिस्टमध्ये कोण – कोण?
रुपाली गांगुलीच्या मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना, नेमकं काय घडलं ?
ऐश्वर्याने अभिषेक सोबत लग्न केल्यामुळे…, सलमान खान याचं मोठं वक्तव्य
प्रदूषणामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास वाढलाय? जाणून घ्या रामबाण उपाय
Maharashtra Election 2024 – लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम होणार नाही, शरद पवार यांचा महायुतीवर निशाणा