महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे, याचा अर्थ भाजप निवडणूक हरते; संजय राऊत यांचा हल्लाबोल

महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे, याचा अर्थ भाजप निवडणूक हरते; संजय राऊत यांचा हल्लाबोल

फडणवीस म्हणाले की ही धर्माची लढाई आहे, होय ही लढाई महाराष्ट्रधर्मासाठी अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला. तसेच महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा दिल्या जातात त्याचा अर्थ अर्थ भाजप निवडणूक हरते असेही संजय राऊत म्हणाले.

आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाहियेत. हा महाराष्ट्र आहे, ज्या मतदारांना भारतीय संविधानाने मताचा अधिकार दिला आहे. मतदार आपल्या आवडीच्या उमेदवाराला किंवा पक्षाला मत देऊ शकतात. भाजपच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही. भाजपला संविधान बदलायचे आहे ते याचसाठी. मतदारांवर दबाव आणला जातोय. देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे धर्मयुद्ध आहे, होय हे धर्मयुद्धच आहे. महाराष्ट्रधर्म राखण्यासाठी आणि वाचवण्यासाठी हे आमचे धर्मयुद्ध आहे. फडणवीस म्हणतात की आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडकावू. फडणवीस यांचे डोके ठिकाणावर आहे का, ही कुठली निवडणूक आहे? पाकिस्तान सोडा आधी पाकव्याप्त कश्मीरमध्ये तिरंगा फडकावून दाखवा. मणिपूर आणि लडाखच्या पेंगोगं तलावाजवळ तिरंगा फडकावून दाखवा जिथे चीनने घुसखोरी केली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत चीन, पाकिस्तान, बटेंगे तो कटेंगे, हे काय चाललंय काय? एखाद्या समाजाची मतं तुम्हाला मिळत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुणाला मत द्यायचं की नाही ते. 2014 च्या निवडणुकीत मुस्लीम समाजाने मोदींना मत दिलं, मग तो वोट जिहाद झाला का? यांचा जो मानसिक गोंधळ आहे, त्याच्याविषयी आम्हाला काळजी वाटते. आणि 23 तारखेनंतर हा गोंधळ अधिक वाढेल. देवेंद्र फडणवीसांना उपचाराची गरज आहे असेही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र जागाच आहे. महाराष्ट्र हा कधीच झोपलेला नाही म्हणूनल लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने तुम्हाला झोपवलं ना? जो पर्यंत महाराष्ट्र जागा आहे तोपर्यंत मोदी शहांना हा देश इंग्रजांप्रमाणे लुटता येणार नाही. आम्ही जागे नसतो तर महाराष्ट्राचा अर्धा सातबारा देवेंद्र फडणवीस कंपनीने गौतम अदानीच्या नावे केला असता अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. .

आमचा धर्म हा महाराष्ट्र धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म महाराष्ट्र धर्म तोच आमचा धर्म. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकच धर्म हिंदू मुस्लीम. या शिवाय त्यांच्या डोक्यात काहीच नाही. जेव्हा निवडणूक हरत असतात तेव्हा धर्मयुद्धाचा प्रश्न उपस्थित होतो. हा राष्ट्रधर्म आणि महाराष्ट्रधर्म आहे, वेळ पडली तर या धर्मासाठी जीवसुद्धा देऊ.
उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवल्यानंतर अमित शहा यांच्या बॅगांची तपासणी झाली. असे असले तरी पैश्यांची देवाण घेवाण जोरदारपणे सुरू आहे. पोलिसांच्या निगराणीखालीच हे व्यवहार सुरु आहेत. वोट जिहाद, लॅंड जिहाद, पाकिस्तानवर तिरंगा फडकावू हे मुद्दे महाराष्ट्राच्या निवडणुकीत का आले? याचा अर्थ भाजप महाराष्ट्रातली निवडणूक हरत आहे. सिल्लोडमध्ये अब्दूल सत्तार यांचा दारुण पराभव होणार आहे. अब्दुल सत्तार सारखे लोक जे कधीच कुणाचे नसतात. कुठल्याही व्यक्तीचे, कुठल्याही पक्षाचे ना विचाराचे नसतात. त्या अब्दुल सत्तारांचा पराभव होणार आहे. आमची सांगता सभा 17 नोव्हेंबरला बीकेसीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार नाही. शिवतीर्थावर आमची सभा होणार नाही. ज्या लोकांना ती सभा घ्यायची आहे त्यांना करावी असेही संजय राऊत म्हणाले. .

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रकमधून जात होती 80 कोटींची चांदी, विधानसभेच्या मतदानापूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाची सर्वात मोठी कारवाई ट्रकमधून जात होती 80 कोटींची चांदी, विधानसभेच्या मतदानापूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाची सर्वात मोठी कारवाई
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात आहे....
फडणवीस असो की अन्य कुणी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार, माझा नादी लागू नका; नवाब मलिकांचा इशारा
‘स्त्री’ बनणार आता ‘इच्छाधारी नागिण’; श्रद्धा कपूरची आगामी चित्रपटासह धमाकेदार एन्ट्री, तीन वर्षांची मेहनत रंग लाई
प्रोडक्शन हाऊसवर कर्जाचा डोंगर, कित्येक कलाकारंचे पैसे थकवल्याचा आरोप; ‘या’ चित्रपटाला हो म्हणणं शाहिद कपूरला महागात
ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, बिग बींची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाले, ‘आता फार उशीर…’
तरुण मुलाला दिला खांदा, 70 व्या वर्षी लेकीपेक्षा लहान मुलीसोबत लग्न, 4 लग्न करणारा अभिनेता आहे तरी कोण?
वारंवार लागते तहान? आरोग्यासाठी धोक्याची घंटा? तज्ज्ञ काय म्हणतात