पोलिसांच्या वाहनातून उमेदवारांना पैशांचा पुरवठा; शरद पवार यांच्या आरोपावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?
अजितदादा यांनी आपल्या काकांपासून फारकत घेत राष्ट्रवादीत फूट पाडून महायुतीत उपमुख्यमंत्री पद मिळविल्यानंतर पवार घराण्यात फूट पडली आहे. यंदा अजितदादांना काकापासून आपला स्वतंत्र पाडवा सण काटेवाडीत साजरा केला आहे. आपण लोकांची गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र मेळावा घेत गर्दी विभाजित केल्याचे उत्तर अजितदादांना यावर दिले आहे. जुन्या पत्रकारांना माहिती असेल आजी- आजोबांना भेटायला काटेवाडीत लोक यायचे. ही खरी जुनी रित होती. नंतर गोविंद बागेत बारामती करांच्या सोयीसाठी पाडवा सुरु झाल्याचे ते यावेळी म्हणाले. आज सकाळी पवार कुटुंबात दोन स्वतंत्र पाडवे झाले. आधी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, नंतर अजितदादा पत्रकारांशी स्वतंत्रपणे बोलले.
काल आपण 25 गावांचा दौरा केला. आपण ठरलेल्या वेळेपक्षा तीन ते चार तास उशीरा पोहचत होतो तरी महिला थांबल्या होत्या. कालचा आणि आजचा दिवस पाहीला तर त्यांना तसे वाटतं मला असं वाटतं. मी काही ज्योतीषी नाहीत.जनता जनार्दन सर्व असते. परंतू बारामतीच्या लोकांना माझ्याबद्दल प्रेम, सहानुभूती असल्याचे अजितदादा यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला अजितदादा यांनी उत्तर दिले. अजित दादांना दहा वर्ष ब्लॅक मेल केलं या आरोपावर मग अजितदादा दहा वर्षांपूर्वीच गेले असते ना असे उत्तर अजितदादांनी दिले आहे.
बिनबुडाचे आरोप आहेत
शरद पवार यांनी पोलिसांच्या व्हॅनमधून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे.त्यावर विचारले असता अजितदादा यांनी जर पोलिसांच्या गाड्या चेक कराव्यात असे उत्तर दिले. निवडणूक आयोगाची टीम असेल तर ते देखील तपासणी करू शकतात. तुझी गाडी चेक करू शकतात. माझी गाडी चेक करू शकतात. त्यांना सर्व अधिकार आहे. हे बिनबुडाचे आरोप आहेत. त्यात काही तथ्य नाही असेही अजितदादा यावेळी म्हणाले. सुरतहून येताना काही लोकांकडे पैसे सापडले.पुण्यात काही लोकांकडे सापडले. आता ते बँकांचे पैसे आहेत की ते अंगडियाचे आहेत माहीत नाही. कधी कधी कंत्राटदारही पैसे काढतात. सोन्या चांदीचे व्यापारी देखील असतात त्यांचा रोखीत व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असतात. तेही पैसे सोयीच्या ठिकाणी नेत असतात असा दावा अजित दादा यांनी यावेळी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List