उद्धव ठाकरे यांची तोफ आज कल्याण,  डोंबिवली, ठाण्यात धडाडणार

उद्धव ठाकरे यांची तोफ आज कल्याण,  डोंबिवली, ठाण्यात धडाडणार

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील विक्रमी प्रचारसभांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात धडाडणार आहे. कल्याण पूर्व येथील दादासाहेब गायकवाड मैदान येथे सायंकाळी 4 वाजता, डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदान येथे सायंकाळी 5 वाजता तर ठाण्यातील गडकरी चौकात सायंकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी दणदणीत सभा होणार आहे.

शिवसेना महाविकास आघाडीचे कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे, कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे, अंबरनाथचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा दादासाहेब गायकवाड मैदानावर सायंकाळी 4 वाजता होणार आहे. डोंबिवलीचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचारासाठी भागशाळा मैदान येथे सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे. तर ठाण्यातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे, कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे, ओवळा-माजिवडय़ाचे उमेदवार नरेश मणेरा आणि ऐरोलीचे उमेदवार एम. के. मढवी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा गडकरी चौक येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे. या सर्व सभांची जय्यत तयारी शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

स्थळ : दादासाहेब गायकवाड मैदान, कल्याण,  वेळ : सायं. 4 वाजता

स्थळ : भागशाळा मैदान, डोंबिवली, वेळ : सायं. 5 वाजता

स्थळ : गडकरी चौक, ठाणे, वेळ : सायं. 7 वाजता

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध, पण आम्ही महाराष्ट्र…; संजय राऊतांचा हल्लाबोल फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध, पण आम्ही महाराष्ट्र…; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध आहे. पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध सुरु आहे, असं...
Amit Thackrey : पुढच्या वेळी घरी येताना… अमित ठाकरे यांना चिमुकलीचे पत्र, अशी मागणी केली की..
‘बेटेंगे तो कटेंगे’वर संजय राऊतांचा निशाणा; म्हणाले जनतेचा ‘मिजाज’…
कैद्याकडून येणाऱ्या गिफ्टबद्दल जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण, ‘महागडे गिफ्ट मिळत असल्यामुळे…’
कदाचित उद्या माझा अखेरचा दिवस… आमिर खानच्या वक्तव्यानंतर चाहते चिंतेत
कीर्तनात व्यत्यय आणल्याने शीख बांधव संतापले.. चलो चलो बाहर निकलो; ठाण्याच्या गुरुद्वारातून नड्डांना बाहेर काढले
धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये रुग्णालात आग, 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू