देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक वाढ, घराबाहेर ही जवान तैनात
महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे आता विधानसभा निवडणुकीनंतरच कळणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्राच्या निवडणुकीची उत्सुकता पाहता राजकीय उलथापालथ होणार हे निश्चित मानले जात आहे. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा अचानक वाढवली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पोहोचताच स्वतंत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागपूर पोलिसांच्या ‘फोर्स वन’ टीमचे जवान शस्त्रांसह तैनात करण्यात आले आहेत.
एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या मुख्य गेटवर शस्त्रांसह ‘फोर्स वन’ टीमचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, मात्र इंटेलिजन्स ब्युरोसह विविध सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मात्र, लॉरेन्स बिष्णोई गँगने महाराष्ट्रात ज्या प्रकारे धमकावून नाव वाढवण्याच्या कारवाया करत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ही सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.
राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. पण पोलीस या प्रकरणात वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहे. आतापर्यंत अनेक जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुशे सलमान खानच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List