पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचं शिट्टी चिन्ह गायब होणार ?

पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचं शिट्टी चिन्ह गायब होणार ?

गेल्या 30 वर्षापासून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची वसई-विरार शहरांवर सत्ता आहे. परंतू लोकसभेत मताधिक्य घटले असताना आता एका नव्या समस्येला बहुजन विकास आघाडीला सामोरे जावे लागत आहे. वसई, नालासोपारा आणि बोईसर येथे तीन आमदार असणाऱ्या बहुजन विकास आघाडीला यंदाची विधानसभा निवडणूक शिट्टी ऐवजी नवीन चिन्हावर लढवावी लागणार अशी चिन्ह आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे निवडणूक चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना भारतीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी सह इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच अपक्षांना शिटी या चिन्हाचा वापर करता येणार नसल्यामुळे वसई, नालासोपारा, बोईसर या विधानसभेसाठी बहुजन विकास आघाडीला निवडणुकीसाठी इतर चिन्हाचा आधार घ्यावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना 30 जानेवारी 2024 रोजी पत्र पाठवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार 2 फेब्रुवारी 2024 रोजी या आशयाच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीत जनता दल (युनायटेड) या पक्षाने उमेदवारी दाखल न केल्याने या चिन्हाचा वापर बहुजन विकास आघाडीला लोकसभा निवडणूकांसाठी करता आला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये शिट्टी या चिन्हाचा समावेश मुक्त चिन्हांच्या यादीमध्ये केल्याने निवडणूक चिन्हे  (राखीव आणि वाटप) कायदा 1968 मधील तरतूदीच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 31 ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.

या पत्रात राजकीय पक्षांसाठी राखीव असलेल्या चिन्हांचा समावेश मुक्त चिन्हांच्या यादीत करु येऊ नये अशी यासंदर्भातील कायद्यात स्पष्ट तरतूद असताना ‘शिट्टी’ या चिन्हाचा मुक्त चिन्ह यादीत समाविष्ट करण्यात आल्याकडे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले होते. तसेच 26 मार्च2014 रोजी भारत निवडणूक आयोगाने काढलेल्या एका अन्य अधिसूचनेत अरुणाचल प्रदेश, बिहार आणि मणिपूर या तीन राज्यात जनता दल ( युनायटेड ) हा नोंदणीकृत राज्य पक्ष असल्याने या पक्षाचे “बाण” हे चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर ‘शिट्टी’ हे चिन्ह राज्यातील नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांना देण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात यावे ही विनंती करण्यात आली होती.

नव्या चिन्हाचा शोध

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने काल सायंकाळी तातडीने उत्तर देतना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हे चिन्ह इतर राजकीय पक्ष अथवा अपक्षांना देण्यात येऊ नये असे देखील स्पष्ट केल्याने वसई, नालासोपारा आणि बोईसर येथे आमदार असणाऱ्या बहुजन विकास आघाडीला नव्या चिन्हाचा शोध घेणे आवश्यक ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ना तेल, ना मसाला, ना चटपटीत; ऐश्वर्या राय बच्चन सासरच्या घरी खाते ‘हे’ पदार्थ ना तेल, ना मसाला, ना चटपटीत; ऐश्वर्या राय बच्चन सासरच्या घरी खाते ‘हे’ पदार्थ
ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. ऐश्वर्या तिच्या कामासोबत आपल्या डाएटबाबतही तेवढी दक्ष असते. त्यामुळे ती आजही...
CBIचे अधिकारीही हैराण झाले; 800 किलो चांदी, 28 किलो सोन्यानं भरलेलं कपाट;देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
‘लाईक आणि सबस्क्राईब’चित्रपट OTT वर प्रदर्शित;कुठे अन् कधी पाहता येणार?
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपाकडूनच महाराजांचा सातत्याने अपमान, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल 
चक्क अजगरावर झोपला, त्याच्याशी खेळला; सोशल मिडीयावर व्हिडीओची जबरदस्त चर्चा…
निवडणूक आली की भाजपाचे नेते हिंदू मुस्लीम करतात, नाना पटोले यांची टीका
वजन कमी होत नाहीए? या चूका टाळा; आहारतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला