पढेंगे तो बढेंगे…! जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर
आज 21 वे शतक आहे. पढेंगे ते बढेंगे अशी घोषणा असायला हवी. मात्र राज्यकर्त्यांची घोषणा काय? तर बटेंगे तो कटेंगे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर हल्ला केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, सनातनी पद्धतीने वागून महाराष्ट्र मागे नेण्याचे काम काही अपप्रवृत्ती करत आहेत. खरं पाहिलं तर निम्मा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात येऊन अर्थार्जन करतो. त्यांना इथे सुरक्षित वाटते आणि योगी आदित्यनाथ इथे येऊन भडकावणाऱया घोषणा करत आहेत. सर्वधर्म समभाव पाळतो. एकोप्याने राहण्याची आमची वृत्ती आहे. त्यामुळेच आमच्या कुठल्याच समाजाने यांच्या भडकाऊ भाषणांनी भीक घातली नाही. सोयाबीनला 6 हजार रुपये आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चे काढले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर फडणवीसांना याचा विसर पडला, असा टोलाही त्यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List