छत्रपती संभाजीनगरात सापडले घबाड, सोन्या-चांदीने भरलेली गाडी जप्त

छत्रपती संभाजीनगरात सापडले घबाड, सोन्या-चांदीने भरलेली गाडी जप्त

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात गुरुवारी सायंकाळी निल्लोड येथे निवडणूक आयोगाला कोटय़वधींचे घबाड सापडले. छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवर स्थिर पथकाने गाडी अडवली. त्यात 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगावच्या नामांकित ज्वेलर्सचे असल्याची माहिती मिळाली आहे. ऐन निवडणुकीत घबाड हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. सर्व दागिने जीएसटी विभागाकडे सोपवले असून दागिने खरेदी-विक्री व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित कागदपत्रांची कसून पडताळणी केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात सभा प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात सभा
कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची सभा उद्या, शनिवारी कोल्हापुरातील गांधी मैदानात होणार आहे. कोल्हापूर...
महाराष्ट्राच्या तोंडातला घास गुजरातला देणारे हात छाटल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला
शिवसेनाप्रमुखांचा उद्या महानिर्वाण दिन, शिवतीर्थावर शक्तिपूजा
धारावीची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार पाडले, राहुल गांधी यांचा हल्ला
शरद पवार यांची भरपावसात सभा, हे तर शुभसंकेत; 2019च्या सातारा सभेची पुनरावृत्ती
कोपरी-पाचपाखाडीत मिंध्यांकडून साड्या वाटप, ठाण्यात आचारसंहिता खुंटीला टांगली
मोदी आणि शहा महाराष्ट्राच्या विकासातील अडथळे, संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला