Aishwarya Rai : घटस्फोटाची चर्चा, तुझ्या नजरेत जगातील सर्वात हँडसम पुरुष कोण? ऐश्वर्याने जे नाव घेतलं ते ऐकून चाहाते शॉक
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. अभिषेक आणि आणि ऐश्वर्या यांना आराध्या नावाची एक मुलगी देखील आहे. सर्व सुरळीत सुरू असतानाच अचानक गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे दोघांचे फॅन देखील चिंतेत आहे. सध्या अभिषेक बच्चन याचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जात आहे. या दोघांनी ‘दसवी’ या चित्रपटात काम केलं आहे. यामुळेच आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद घटस्फोटापर्यंत गेल्याची चर्चा आहे.
दरम्यान हे सर्व सुरू असताना ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ द कपील शर्मा शोमधील आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या राय आली असता तिला कपील शर्माने विचारलं की तुझ्या नजरेत जगातील सर्वात हँडसम पुरुष कोण? यावर ऐश्वर्याने क्षणाचाही विलंब न लावता अभिषेक बच्चन याचं नाव घेतलं. मी ज्याच्याशी लग्न केलं आहे, तो माझ्या नजरेत जगातील सर्वात हँडसम पुरुष असल्याचं ऐश्वर्या रायनं म्हटलं आहे. मात्र आता गेल्या काही महिन्यापासून सातत्यानं अभिषेक आणि ऐश्वर्या हे विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
ऐश्वर्या, अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. त्याला कारण म्हणजे ऐश्वर्या रायचा बच्चन कुटुंबापासून वाढत असलेला दुरावा हे आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चन हा आपल्या सर्व कुटुंबासोत सहभागी झाला होता, मात्र ऐश्वर्या राय ही आपल्या मुलीसोबत एकटीच आली होती. ती बच्चन कुटुंबासोबत आली नाही, त्यामुळे ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. मात्र याबाबत ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन किंवा बच्चन कुटुंबाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये. मात्र दोघांमध्ये वाढत असेली दुरी पाहाता त्यांच्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List