सौंदर्याला वय नसतं, ‘या’ भारतीय अभिनेत्रीची नेदरलँडमध्येही चर्चा, चक्क फुलाला दिलं नाव…

सौंदर्याला वय नसतं, ‘या’ भारतीय अभिनेत्रीची नेदरलँडमध्येही चर्चा, चक्क फुलाला दिलं नाव…

सौंदर्य, अदा आणि नजाकत याबाबत मधुबालाचा हात कोणी पकडू शकत नाही. मधुबाला म्हणजे फिल्म इंडस्ट्रीला पडलेलं एक गोड स्वप्न होतं. मधुबालासारखाच एक चेहरा सध्या बॉलिवूडमध्ये आहे. या चेहऱ्याने संपूर्ण बॉलिवूडला वेड लावलं आहे. तो चेहरा म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. आज ऐश्वर्याचा वाढदिवस आहे. सौंदर्य किती वर्षाचं झालं हे विचारायचं नसतं. ऐश्वर्याच्याबाबतही हाच नियम लागू होतो. ऐश्वर्याच्या आयुष्यात अनेक रोचक घटना घडल्या आहेत. अनेकांना त्यातून प्रेरणा मिळू शकते. ऐश्वर्याबाबतच्या माहीत असलेल्या आणि नसलेल्या अशा गोष्टींवर टाकलेला हा प्रकाश.

1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकाच्या मंगळुरूमध्ये ऐश्वर्याचा जन्म झाला. वडील कृष्णराज राय हे मरीन इंजीनिअर होते. आई वृंदा राय या लेखिका आहेत. ऐश्वर्याला एक मोठा भाऊ आहे. आदित्य त्याचं नाव. आईच लेखिका असल्याने ऐश्वर्याला तिचा खूप फायदा झाला. तिच्यावर आईचे चांगले संस्कार झाले. ऐश्वर्या कर्नाटकात जन्माला आलेली असल्याने ती तेलगू भाषा अस्खलितपणे बोलते. त्याशिवाय तिला कन्नड, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तमिळही येते. ऐश्वर्याचं सुरुवातीचं शिक्षण हैदराबाद, आंध्रप्रदेशात झालं. त्यानंतर राय कुटुंब मुंबईत आलं. मुंबईत सांताक्रुझ येथील आर्य विद्या मंदिर आणि नंतर माटुंग्याच्या डीजी रुपारेल कॉलेजात ऐश्वर्याचं शिक्षण झालं.

मॉडेलिंगमध्ये ब्रेक

ऐश्वर्याला शिक्षण सुरू असतानाच मॉडेलिंगच्या ऑफर येत होत्या. ती लहानपणापासूनच सुंदर होती. निळे डोळे आणि शार्प फेस… तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो होता. शिक्षणासोबतच तिने मॉडेलिंगही केलं. नववीला असतानाच तिला कॅमलिन कंपनीने मॉडेलिंगचं काम दिलं. त्यानंतर कोक, फ्रुटी आणि पेप्सीच्या जाहिराती तिने केल्या. मॉडेलिंगच करायचं हे डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला होता. 1994मध्ये मिस इंडिया स्पर्धेत ती उपविजेती ठरली होती. पण त्याच वर्षी मिस वर्ल्ड स्पर्धेचा पुरस्कार तिने पटकावला होता.

रेखा भेटली त्याचा किस्सा

मिस वर्ल्ड बनल्यानंतर ऐश्वर्या राय देशातील एक सुप्रसिद्ध नाव झालं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही तिला ओळखलं जाऊ लागलं. तिला भेटण्यासाठी, तिची एक झलक पाहण्यासाठी लोक तास न् तास रांगेत उभं राहायचे. मात्र, बॉलिवूडमध्ये सर्वात आधी ऐश्वर्याने रेखाची भेट घेतली होती. ऐश्वर्या रेखाला भेटली तेव्हा हायस्कूलमध्ये शिकत होती. शिवाय तेव्हा ती मॉडेल होती. ऐश्वर्या एका किराणाच्या दुकानात आईसोबत गेली होती. तेव्हा पाठीमागून रेखा आल्या आणि त्यांनी ऐश्वर्याला टपली मारली. एका मॉडेलिंगच्या जाहिरातीमुळे रेखा यांनी तिला ओळखलं होतं. तेव्हा आपण एके दिवशी मोठ्या स्टार होऊ असं ऐश्वर्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

हे माहीत असायलाच हवं…

लंडनच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये व्हॅक्स स्टॅच्यू असलेली ऐश्वर्या ही पहिली बॉलिवूडची अभिनेत्री आहे.

एप्रिल 2003मध्ये खाकी सिनेमाच्या शुटिंग दरम्यान तिचा मोठा अपघात झाला होता. त्यावेळी तिच्या पायाची हड्डी तुटली होती. तिला बराच मार लागला होता.

पुढच्याच वर्षी 2004मध्ये ऐश्वर्याने ऑलिम्पिक टॉर्च रिलेमध्ये भाग घेतला होता. टॉर्च लिफ्ट केलं होतं. ऐश्वर्याला घड्याळांची खूप आवड आहे असं सांगितलं जातं.

ऐश्वर्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 2006मध्ये दुबईत तिची एक साबणाच्या जाहिरातीची शुटिंग सुरू होती. त्यावेळी तिला पाहण्यासाठी लोकांची इतकी गर्दी झाली होती की दिवसभर ट्रॅफिक जाम झालं होतं. ऐश्वर्याची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

रोलिंग स्टोन मॅगझिनमध्ये झळकलेली ऐश्वर्या ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. ऐश्वर्याच्या नावाने नेदरलँड येथील एका ट्युलिप फुलाला नावही देण्यात आलं आहे.

हिंदी सिनेमातील योगदानाबद्दल भारत सरकारने तिला चौथा सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. पद्मश्री मिळवणारी ऐश्वर्या ही सर्वात कमी वयाची अभिनेत्री आहे. ती अनेक अनाथालयात जाते आणि मोठा निधी देत असते.

1998मध्ये कुछ कुछ होता है हा सिनेमा आला होता. यातील राणी मुखर्जीची भूमिका ऐश्वर्याला ऑफर झाली होती. पण तिने हा रोल करण्यास नकार दिला होता.

IMDBच्यानुसार ऐश्वर्या मोस्ट फोटोग्राफ्ड इंडियन वुमन आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले?
महायुतीचा मुख्यमंत्री हा संख्याबळावर ठरणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार...
विषारी हवा आणि संसर्गापासून वाचवतील व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली फळे
पुरुषांमधील वंध्यत्वावर ‘हा’ उपाय ठरेल रामबाण
ठाण्यात मिंध्यांनी आचारसंहिता खुंटीला टांगली, महिलांना साड्यांचे वाटप; शिवैसनिकाकडून भंडाफोड
Health Tips: 21 दिवस सतत रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे
पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर खोटे आरोप: रमेश चेन्नीथला
कामे अर्धवट असतानाही विशिष्ट व्यक्तीसाठी उद्घाटन केलं जातं, बीकेसीत आग प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका