देवणी तालूक्यात वीज पडून सहा जनावरे दगावली, परतीच्या पावसाचा तडाखा
ऐन दिवाळीच्या संध्येला 31 ऑक्टोबर रोजी देवणी खू. व येनगेवाडी येथे अवकाळी पावसासह वीज पडून एकाच वेळी सहा जनावरे दगावली. यामध्ये तीन म्हशी तीन गाईंचा समावेश आहे.
तालुक्यातील देवणी खुर्द येथे गुरुवारी संध्याकाळ च्या दरम्यान वीज पडून सहा जनावरे दगावली. या घटनेत लहू तुळशीराम पाटील यांची दोन म्हशी दोन गाई तसेच येनगेवाडी येथील दत्तू राम शिवराम व्यंजने यांची एक म्हैस एक गाय असे वीज पडून एकूण सहा जनावरे दगावली आहेत. घटनेची त्वरित दखल घेऊन देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी पंचनामा करण्यासाठी दे वणी खुर्द सज्जाचे तलाठी भंडारे डी एम यांनी पंचनामा करण्यास पाचारण केले . ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेने लाखो रूपयाचे पशुधन गेल्याने पशू पालकांना अर्थीक फटका बसला आहे. शासनाने तात्काळ मदत मीळवून देण्याची विनंती पशूमालकांनी शासनाकडे केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List