सुपे टोलनाक्यावर कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त

सुपे टोलनाक्यावर कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त

विधानसभा महामार्गावरील सुपे टोलनाक्यावर तैनात असलेल्या स्थिर पथकाने केलेल्या तपासणीत वाहतूक कंपनीच्या गाडीतून कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच या गाडीतून 40 किलो वजनाची चांदीची वीट आढळली आहे. याबाबत निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रमुखांनी ही बाब आयकर विभागाला तसेच सुपे पोलिसांना कळवली. सहायक – निवडणूक निर्णय अधिकारी गायत्री सौंदाणे यांनी दुजोरा दिला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत 10 कोटी रुपयांच्या सोन्याची मोजदाद करण्यात आल्याची माहिती समजली आहे.

गाडीमध्ये सोने, चांदीच्या वस्तू आढळून आल्याची माहिती मिळताच आयकर विभागाचे – अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आचारसंहिता कक्षप्रमुख सुपे टोलनाक्यावर दाखल झाले. रात्री – उशिरापर्यंत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोने व चांदीच्या विविध वस्तूंची मोजदाद सुरू होती. संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 10 कोटींच्या – सोन्याची मोजदाद झाली होती. सोन्याच्या अद्याप बऱ्याच वस्तू मोजणे बाकी असल्याचे आचारसंहिता कक्षप्रमुख दयानंद पवार यांनी सांगितले.

आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यावरून अहिल्यानगरकडे जाणारे बीव्हीसी लॉजिस्टिक्स कंपनीचे काळ्या रंगाचे बंदिस्त पीकअप वाहन (एमएच 09 ईएम 9530) तपासणी पथकाने तपासणीसाठी थांबवले. तपासणीत या वाहनात मोठ्या प्रमाणावर सोने तसेच चांदीची 40 किलोची वीट आढळून आली.

वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. तसेच त्यांच्याकडे असलेल्या वाहतुकीच्या पावत्या व प्रत्यक्षात असलेले सोने यांचा हिशेब जुळत नव्हता. सोन्याची वाहतूक नेमकी कुठून कुठे केली जात आहे, याबाबत वेगवेगळी माहिती वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जात होती. वाहनात सापडलेल्या सोन्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने तपासणी पथकप्रमुख माधव गाजरे यांनी या प्रकाराची माहिती आचारसंहिता कक्षप्रमुख दयानंद पवार यांना कळवली. त्यानंतर आयकर विभाग तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली. संध्याकाळी सात वाजेपर्यंत तब्बल 10 कोटी रुपये किमतीच्या सोन्याची मोजदाद झाली असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरूच होती.

करचुकवेगिरीचा संशय

विधानसभा निवडणुकीचा आणि या सोन्याचा संबंध नसावा. मात्र, मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी करण्यासाठी अवैध पद्धतीने कोट्यवधी रुपये किमतीच्या सोन्याची वाहतूक करण्याचा हा प्रकार असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं होतं ‘वन नाईट स्टँड’; न बोलवताच पार्टीत पोहोचली दारू पेऊन बेशुद्ध, नशेतच दिला लग्नाला होकार प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं होतं ‘वन नाईट स्टँड’; न बोलवताच पार्टीत पोहोचली दारू पेऊन बेशुद्ध, नशेतच दिला लग्नाला होकार
अभिनेत्री महीप कपूरने 1997 साली संजय कपूरसोबत लग्न केलं. त्यांना आता दोन मुलं आहेत. शनाया कपूर आणि जहान कपूर अशी...
माझ्या अंगात प्राण आहे तोपर्यंत महाराष्ट्र लुटायला देणार नाही, उद्धव ठाकरे गरजले
Champions Trophy – ICC ने पाकिस्तानला ठणकावले, PoK मध्ये ट्रॉफी नेण्यास मनाई
मुख्यमंत्री कपड्याने योगी आहेत, विचारांनी नाही; अखिलेश यादव यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका
अमेरिकेत दरवर्षी किती लोकांना मिळतं ग्रीन कार्ड? यात हिंदुस्थानी नागरिकांची किती आहे संख्या? जाणून घ्या
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले?
विषारी हवा आणि संसर्गापासून वाचवतील व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली फळे