राज्यात सापडलेल्या बोगस आधार कार्डबाबत संजय राऊत यांचा आरोप कोणावर? नेमके काय म्हणाले राऊत…

राज्यात सापडलेल्या बोगस आधार कार्डबाबत संजय राऊत यांचा आरोप कोणावर? नेमके काय म्हणाले राऊत…

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील वेणा नदीत पोलिसांना 800 आधार कार्ड सापडले. त्यानंतर पोलिसांनी फेकलेले आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणावरुन शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप केला आहे. दुसऱ्या राज्यातील मतदार घुसवण्यासाठी हे बोगस आधार कार्ड भाजपच्या आयटी सेलने आणल्याचे राऊत यांनी म्हटले.

काय म्हणाले संजय राऊत

विधानसभा निवडणुकीत बोगस आधार कार्डच्या माध्यमातून बोगस मतदान होत आहे. हा भाजपच्या आयटी सेलकडून उपक्रम सुरु आहे. हा प्रकार खूप गंभीर आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाच-दहा हजार अशी बोगस मतदार बनवण्यात आले आहे. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. परंतु निवडणूक आयोग त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात अनेक भागांत रोकड सापडत आहे. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, आचारसंहिता लागल्याच्या अर्ध्यारात्रीपर्यंत या लोकांनी आपआपल्या उमेदवारांपर्यंत पोलीस बंदोबस्तात पैसे पोहचवले आहेत. त्यांना कोण अडवणार? आता जी रक्कम पकडली जात आहे ती रक्कम त्या तुलनेत किरकोळ आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव ठरलेला आहे. महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे की देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकू द्यायचे नाही.

रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सरळ सरळ भाजपसाठी काम करत होत्या. आमचे फोन टॅपिंग करुन त्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांना देत होते. त्या आज पोलीस महासंचालक आहेत. त्या निष्पक्ष निवडणूक करु शकता का? आम्ही त्यांच्यासंदर्भात तक्रार केली तेव्हा निवडणूक आयोग म्हणतो ते आमच्या हातात नाही. परंतु झारखंडच्या पोलीस महासंचालकांना बदलले जाते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा व्यक्त करु शकतो. आमचे फोन आजही टॅप केले जातात. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी निवड बेकायदेशीर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार का? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत देत सांगितले, राजकारणात… उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार का? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत देत सांगितले, राजकारणात…
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणुकीनंतरचे समीकरण कसे असणार? त्यावर चर्चा होत...
“छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा…”, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले
“महिला, रोजगार आणि…”, मनसेच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख मुद्दे काय?
मृणाल दुसानिसचं 4 वर्षांनंतर मालिकेत पुनरागमन; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये कलाकारांची फौज
सोशल मीडियाची ताकद; व्हायरल चहावाल्याचं पालटलं नशीब, शार्क टँकमध्ये मिळाली मोठी ऑफर
पलक तिवारी होणार सैफ अली खानची सून? इब्राहिमबद्दल म्हणाली, ‘मला तो आवडतो आणि…’
सुबोध भावे-तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला