उद्धव ठाकरे यांचा मंगळवारपासून झंझावाती दौरा, कोकणातून सुरुवात; पहिल्या टप्प्यात 8 मतदारसंघ 

उद्धव ठाकरे यांचा मंगळवारपासून झंझावाती दौरा, कोकणातून सुरुवात; पहिल्या टप्प्यात 8 मतदारसंघ 

 दिवाळीनंतर पुढच्या आठवडय़ापासून खऱया अर्थाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मंगळवार, 5 नोव्हेंबरपासून झंझावाती प्रचार दौरा सुरू होणार आहे. कोकणातून या दौऱयाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 विधानसभा मतदारसंघांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्याच दिवशी   लढतींचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर प्रचाराला अवघे 15 दिवस मिळणार असल्याने लगेचच प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने जोरदार आखणी केली असून 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे झंझावाती दौऱयावर जाणार आहेत. याबाबत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून माहिती देण्यात आली.
5 नोव्हेंबर       सायं. 6 वाजता     रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा
6 नोव्हेंबर       दुपारी 3 वाजता    भिवंडी ग्रामीण विधानसभा
                  सायं. 7 वाजता     वांद्रे-कुर्ला संकुल मैदान येथील महाविकास आघाडीची सभा
7 नोव्हेंबर       दुपारी 3 वाजता     दर्यापूर विधानसभा
         सायं. 5 वाजता     बडनेरा विधानसभा
8 नोव्हेंबर       दुपारी 3 वाजता     बुलढाणा विधानसभा
                  सायं. 5 वाजता     मेहकर विधानसभा
                  सायं. 7 वाजता     परतूर विधानसभा

महाविकास आघाडीची बुधवारी बीकेसी मैदानावर विराट सभा

महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ येत्या बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी फुटणार आहे. बीकेसी मैदानावर 6 नोव्हेंबरला महाविकास आघाडीची विराट सभा होणार आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Devendra Fadnavis : महायुतीचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मी शर्यतीत… Devendra Fadnavis : महायुतीचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मी शर्यतीत…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर चर्चा सुरू आहे. काल टीव्ही 9 मराठीला दिलेल्या...
अजित पवारांच्या मनात नेमकं काय? आधी शाह, आता पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला दांडी, राष्ट्रवादीचे नेतेही गैरहजर
Devendra Fadnavis : राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागली? शरद पवार यांचा काय रोल होता?; देवेंद्र फडणवीस यांनी केला आजवर न झालेला गौप्यस्फोट
महाविकास आघाडीने उलेमांच्या १७ मागण्या मान्य केल्या, त्यातील एक मागणी तर….देवेंद्र फडणवीस यांनी साधला निशाणा
वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडा, अन्यथा काडीमोड; महायुतीमध्ये पहिली ठिणगी, अजितदादांच्या शिलेदाराचा भाजपाला थेट इशारा
‘बटेंगे तो कटेंगे’, योगींच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीस यांचे प्रथमच भाष्य, थेट म्हटले…
Raj Thackeray MNS Manifesto: 2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही…राज ठाकरे यांनी कोणत्या गोष्टीचा केला उल्लेख