“मी अर्धा वनवास पूर्ण केला”; सात वर्षांनी गोविंदाला घरी भेटायला गेला कृष्णा,मामा-भाच्यामधील वाद मिटला
Krushna Ends Feud With Govinda: बॉलिवूडमध्ये चित्रपटांप्रमाणेच चर्चा असते ती कलाकारांच्या खाजगी आयु्ष्याबद्दलची. मग ते प्रेमसंबंध असो, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट असो किंवा एकमेकांसोबतचे वाद असो. कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल गॉसिप तर होणारच. अशाच एका वादाची चर्चा बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंत सगळ्यांमध्येच रंगली होती ती म्हणजे लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि भाचा कृष्णा अभिषेक यांच्या वादाची. मात्र तब्बल सात वर्षांनी हा वाद मिटल्याचं बोललं जातं आहे.
सात वर्षांनी मामाला भेटायला गेला कृष्णा
गेल्या काही वर्षांत गोविंदा आणि कृष्णा तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अनेकदा वाद सुरु असलेले सर्वांनाच माहित आहे. मात्र काही दिवसांपूर्वी घरीच पिस्तूल साफ करताना अनवधानाने गोळी सुटली आणि ती गोळी गोविंदा यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले होते. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ते बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थनादेखील केल्या. त्याचवेळी गोविंदा व त्यांचा भाचा कृष्णा अभिषेकला सुद्धा मामाची काळजी वाटत होती. तेव्हा कृष्णा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात होता. मात्र त्याची पत्नी कश्मिरा शाह बातमी समजताच गोविंदाला भेटायला गेली होती.
गोविंदा यांच्या घरी पोहोचल्यानंतर कृष्णाने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “चीची मामाबरोबर जी दुर्घटना घडली तेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. मी माझा दौरा रद्द करणार होतो. पण रुग्णालयातील कर्मचारी व कश्मिरा बरोबर बोललो. तेव्हा सगळं ठीक असल्याचं सांगितलं गेलं आणि मी निश्चिंत झालो”.
पुढे तो म्हणाला की, “मी भारतात आल्यानंतर सात वर्षात पहिल्यांदाच मामाच्या घरी पोहोचलो. मी अर्धा वनवास पूर्ण केला असं मला वाटलं. मी त्यांच्याबरोबर एक तास वेळ घालवला आणि सात वर्षानंतर नम्मोला (टीना आहुजा) भेटलो. आमची भेट खूप भावनिक होती. मी त्यांना मिठी मारली. तसेच जे भूतकाळात घडले त्याबद्दल अजिबात चर्चा केली नाही”.
त्यानंतर तो म्हणाला की, “आम्ही भूतकाळात राहिलो नाही. आम्ही एक कुटुंबं आहोत त्यामुळे गैरसमज होणारच. पण अशा गोष्टींमुळे आम्ही अधिक लांब राहणार नाही. मामी खूप व्यस्त होती त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही. पण त्यांना भेटायला मी घाबरत होतो. त्या मला ओरडतील असं मला वाटलं. पण तुमच्याकडून काही चुका झाल्या तर मोठ्यांकडून ओरडा ऐकण्याचीदेखील तयारी ठेवावी. पण मी त्यांच्याकडे आता जात जाईन मामा-मामींना भेटेन”. असं म्हणत हा वाद आता मिटल्याचे कृष्णाने सांगितले आहेत.
मामासाठी भावूक पोस्ट
काही दिवसांपूर्वी कृष्णाने मामा गोविंदासाठी एक भावुक पोस्टही लिहिली होती. “मी खूप हुशार आहे असं लोक म्हणतात. पण माझ्या शरीरात अर्ध रक्त जर गोविंदा मामा सारख्या हुशार माणसाचं असल्याने मी हुशार तर असणारच. खूप प्रेम चीची मामा. हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही लवकर बरे व्हा. मला तुमच्याबरोबर नाचायचं आहे”.
ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या पोस्टवर सर्वांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत मामा भाचे एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.
गोविदां का होते कृष्णावर नाराज
गोविंदा यांनी आपल्या कृष्णाच्या विनोदबुद्धीवर आणि काही विनोदांवर उघडपणे आक्षेप घेतला होता. याशिवाय, कृष्णाच्या पत्नीकडून गैरवर्तन आणि अपमानाचे कारण देत त्याने कृष्णा आणि कश्मिरा यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांच्याशी पुन्हा कधीही न बोलण्याची शपथ घेतली.
मात्र, या वर्षी एप्रिलमध्ये कृष्णाची बहीण आरतीचे लग्न झाले तेव्हा गोविंदा आपला मुलगा यशवर्धनसोबत लग्नाला उपस्थित होते आणि असे म्हणतात की याच लग्नात कश्मिरानेही गोविंदा यांची माफी मागितली होती. त्यामुळे या वादाला हळूहळू मिटायला सुरुवात झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List