NCP Ajit Pawar Group Candidate List: अजित पवार गटाची पहिली यादी; 38 जणांची नावं जाहीर, कुणा- कुणाला संधी?

NCP Ajit Pawar Group Candidate List: अजित पवार गटाची पहिली यादी; 38 जणांची नावं जाहीर, कुणा- कुणाला संधी?

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाती पहिली यादी जाहीर झाली आहे. 38 उमेदवारांची पहिली यादी अजित पवार गटाने जाहीर केली आहे. यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार आहेत. याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी

बारामती- अजित पवार

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

अमरावती- सुलभा खोडके

इंदापूर- दत्तात्रय भरणे

पिंपरी- अण्णा बनसोडे

पाथरी- निर्मला विटेकर

मावळ – सुनील शेळके

येवला- छगन भुजबळ

कागल- हसन मुश्रीफ

सिन्नर – माणिकराव कोकाटे

श्रीवर्धन – अदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले

माजलगाव- प्रकाश सोळंखे

वाई – मकरंद पाटील

खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील

अहमदनगर – संग्राम जगताप

इंदापूर- दत्तात्रय भरणे

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

कळवण- नितीन पवार

कोपरगाव- आशुतोष काळे

अकोले- किरण लहामटे

वसमत – राजू नवघरे

चिपळूण- शेखर निकम

जुन्नर- अतुल बेनके

मोहोळ- यशवंत माने

हडपसर- चेतन तुपे

देवळाली- सरोज अहिरे

चंदगड- राजेश पाटील

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर- राजू कारेमोरे

पुसद- इंद्रनील नाईक

नवापूर- भरत गावित

मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला

पहिल्या यादीतून महिलांना संधी

अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवार यादीत महिलांनादेखील संधी देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना श्रीवर्धनमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीतून सुलभा खोडके यांना उमेदवारी जाहीर झालीय. सरोज अहिरे यांना देवळाली, तर पाथरीतून निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचं नाव नाही

अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली. यात पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचं नाव नाहीये. अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत. मात्र त्यांचं नाव या पहिल्या यादीत नाहीये. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे जाणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा ‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा
महाविकास आघाडीची आज मुंबईतील बीकेसीत प्रचारसभा पार पडली. या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख...
शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
जातीनिहाय जनगणना करू आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू – राहुल गांधी
महिलांना महिन्याला 3 हजार रुपये खटाखट खटाखट देणार… बसमध्ये प्रवास फ्रि; राहुल गांधी यांनी दिली महागॅरंटी
मुंब्य्रात महाराजांचं मंदिर बांधण्याच्या फडणवीसांच्या आव्हानावर काय म्हणाले उद्धव ठाकरे
कोरोना काळात आम्ही धारावी वाचवली होती आता पुन्हा एकदा धारावी वाचवणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन