मविआचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, कोण किती जागा लढणार?, वाचा संपूर्ण माहिती…
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशातच दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अद्याप झालेलं नाही. जागावाटपावरून महाविकास आघाडीत सुरु असलेली रस्सीखेच अखेर आता थांबली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस सर्वाधिक 105 जागा लढणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट 95 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. शरद पवार गट 84 जागांवर लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यात जागावाटप जाहीर केलं जाणार आहे.
कोण किती जागा लढणार?
काँग्रेस- 105
ठाकरे गट – 95
शरद पवार- 84
निवडणूक जाहीर होण्याच्याआधीपासूनच महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बैठका होत आहेत. मात्र निवडणूका जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी महाविकास आघाडीचं जागावाटप झालं नाही. जागावाटपासाठी मॅरथॉन बैठका झाल्या. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. अखेर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं जागावाटपाबाबत एकमत झालं आहे.
विदर्भातील जागांवरून वाद
महाविकास आघाडीतील नेते जरी सगळं अलबेल असल्याचं सांगत असले. तर जागावाटपावरून विशेषत: विदर्भातील काही जागांवरून आघाडीत वाद होते. लोकसभेला काही जागा काँग्रेसला दिल्याने आता विधानसभेला ठाकरे गट जास्त जागांवर लढण्याबाबत ठाम होता. मात्र काँग्रेस विदर्भातील जागा ठाकरे गटाला सोडण्यासाठी तयार नव्हता. मात्र आता यावर तोडगा निघाला आहे.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List