“मी काळवीटची शिकार..”; सलमानची ती मुलाखत पुन्हा एकदा व्हायरल
काळवीट शिकार प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगकडून अभिनेता सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यादरम्यान सलमानची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत सलमान काळवीट शिकार प्रकरणाबद्दल बोलताना दिसून येत आहे. या प्रकरणात प्रदीर्घ चाललेल्या खटल्यानंतर सलमानची निर्दोष सुटका झाली होती. तरीही बिष्णोई गँगकडून अनेकदा त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. 2008 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत काळवीट शिकार प्रकरणातील आपल्या सहभागाबद्दल सलमान व्यक्त झाला होता. मी काळवीटला मारलं नाही, असं तो या व्हिडीओत म्हणताना दिसतोय.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा सलमानला काळवीट शिकारबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, “ही खूप मोठी कहाणी आहे आणि मी काळवीटला मारलं नाही.” जेव्हा पत्रकार सलमानला पुढे विचारते की त्याने दोषीचं नाव का घेतलं नाही, त्यावर तो म्हणतो, “त्यात काही अर्थ नाही. मी कधीच कोणाबद्दल काही बोललो नाही. मला त्याची गरज नाही आणि मी असं करणारही नाही. जर यात कोणीही सहभागी असेल तर मला त्याबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही. जर मला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्याच्या आयुष्याला वाचवायचं असेल तर मी तो आरोप स्वत:वर घेईन आणि खोटं बोलेन. माझा कर्मावर खूप विश्वास आहे.”
पहा व्हिडीओ-
I wasn’t the one who shot the blackbuck says Salman (2008)
byu/Icy-One-5297 inBollyBlindsNGossip
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानचे वडील आणि दिग्गज लेखक सलीम खान यांनीसुद्धा त्याचा बचाव केला होता. सलमानने प्राण्याची शिकार केली नाही आणि शिकारीच्या वेळी तो तिथे उपस्थितही नव्हता, असं ते म्हणाले. “आणि तो मला खोटं सांगणार नाही. त्याला प्राण्याला मारण्याचा शौक नाही. प्राण्यांवर तो प्रेम करतो. माफी मागितल्याचा अर्थ असा होईल की त्याने चूक मान्य केली. सलमानने कधीच कोणत्या प्राण्याला मारलं नाही. आम्ही कधी कोणत्या झुरळालाही मारलं नाही. आम्ही अशा गोष्टींवर विश्वासच करत नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
“सलमानने कोणाकडे जाऊन माफी मागावी? तुम्ही किती लोकांची माफी मागितली आहे, किती प्राण्यांचा तुम्ही जीव वाचवला आहे? सलमानने कोणता गुन्हा केला आहे? तुम्ही पाहिलंय का? तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही तपास केलाय का? आम्ही तर कधी बंदुकसुद्धा वापरली नाही”, अशा शब्दांत त्यांनी सलमानचा बचाव केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List