लॉरेन्स बिश्नोईकडून जीवेमारण्याच्या धमक्या, दुबईत पोहचताच सलमान खान करणार असं काम!
Salman Khan: काळवीट शिकार प्रकरणी गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर अभिनेता सलमान खान गेल्या कित्येक वर्षापासून आहे. अनेकदा अभिनेत्याला धमकावण्यात देखील आलं आहे. दरम्यान सलमान खानचे खास मित्र आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर तात्काळ सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. खान कुटुंबावर सध्या भीतीचं वातावरण आहे. असं असताना देखील सलमान खान त्याची कामं वेळेत पूर्ण करत आहे. ‘विकेंड का वार’ नंतर सलमान खान ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय अभिनेता दुबईत देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांमुळे सलमान खान संपूर्ण सुरक्षेसह मुंबईत आहे. ‘सिकंदर’ सिनेमाचं शूट मुंबईबाहेर होणार होतं. पण ते रद्द करून सेट मुंबईतच बनवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका रिपोर्टनुसार, सलमान खान लवकरच एका कार्यक्रमासाठी दुबईला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दबंग रीलोडेड या कार्यक्रमासाठी सलमान खान दुबईत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शोची सुरवात 7 डिसेंबर होणार असल्याची माहिती मिळत आहे. जीवाला धोका असताना देखील सलमान सर्व शुट आणि कार्यक्रम वेळेत पूर्ण करत आहे. अभिनेता सगल वेग-वेगळ्या प्रोजेक्टवर काम करताना दिसत आहे.
शोमध्ये सलमान खान याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, सुनील ग्रोवर, आस्था गिल आणि मनीष पॉल देखील उपस्थित राहणार आहे. शो Dubai Harbour याठिकाणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोच्या तिकिटांची विक्री देखील सुरु झाली आहे.
सलमान खान शोमध्ये पूर्ण सुरक्षेसह पोहोचेल असं सांगण्यात येत आहे. पण काही अडचणी निर्माण झाल्या तर, कार्यक्रमात काही बदल होऊ शकतात… अस देखील सांगण्यात येत आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान याने ‘सिंघम अगेन’ सिनेमाची शुटिंग देखील पूर्ण केली आहे. सिनेमात अभिनेता पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
सलमान खानच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘सिकंदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना सलमान सोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List