छान पूजा केली, हार घातला; झापूक झुपूक सूरज चव्हाणचा नव्याकोऱ्या स्कुटरसोबत फोटो
‘बिग बॉस मराठी 5’ हे पर्व विशेष गाजताना दिसलं. या पर्वामधील सर्वच कलाकारांची चर्चाही सर्वत्र झालेली पाहायला मिळाली. या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणला तर भलताच प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच बिग बॉसची ट्रॉफी बारामतीत गेल्याने बारामतीकरांनीही आनंद व्यक्त केला. सबंध महाराष्ट्रातून सूरजवर भरभरुन प्रेम केलं आणि त्यांच्याच प्रेमामुळे तो विजेताही ठरला. बिग बॉसच्या घरात असतानाही सूरजला तेवढा ठाम विश्वास होता की ट्रॉफी तोच जिंकणार. तो चाहत्यांना देव मानतो. अनेकदा त्याने हे बोलूनही दाखवल होतं की फॅन्स माझ्यासाठी देव आहेत ते मला जिंकवणारचं आणि खरचं तसेच झाले त्यांच्या प्रमामुळे बिग बॉस मराठी 5ची ट्रॉफी ही सूरजच्या हाती आली. सूरजने ट्रॉफी जिंकल्यावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय.’बिग बॉस’ नंतरही सूरज बराच चर्चेत असलेला पाहायला मिळतोय.
स्कुटरसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट
सूरज चव्हाण जेव्हा बिग बॉसचा विजता ठरला तेव्हा भरघोस बक्षीस मिळालेली पाहायला मिळाली. सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर त्याला ‘बिग बॉस’ ची ट्रॉफी तर मिळालीच याशिवाय १४ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कमही त्याने पटकावली. तर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून १० लाखांचा चेक मिळाला.
इतकंच नव्हे तर पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्याकडून डायमंड ज्वेलरी देखील मिळाली. तसेच त्याला विजेता होताच इलेक्ट्रिक स्कूटरही भेट म्हणून मिळाली. इलेक्ट्रिक स्कुटर सूरजच्या हातात येताच त्याने त्याच्या नव्या स्कुटरबरोबरचा फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट करत आभार व्यक्त केले आहेत. त्या स्कुटरची त्याने छान पूजा केली, हार घातला. आपल्या नव्याकोऱ्या स्कुटरसोबत फोटो काढून तो पोस्ट केला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
चाहत्यांच्या प्रेमाने जिंकूण दिली ट्रॉफी
‘बिग बॉस’ च्या घरात असतानाच सूरजचे सर्व स्पर्धकांबरोबर चांगले संबंध होते. घराबाहेर पडल्यानंतरही तो सर्व स्पर्धकांशी मिळून मिसळून वागताना दिसतो. घरात असताना रितेश देशमुख कडूनही भाऊच्या धक्क्यावर सूरजच भरभरुन कौतुक झालेलं पाहायला मिळालं. योग्य तो खेळ खेळत सूरजने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सूरजला नीट लिहिता- वाचता येत नाही, तो हा खेळ कसा खेळणार असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र या सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर देत सूरजने ‘बिग बॉस’ची मानाची ट्रॉफी पटकावली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List