‘घुंगुरकाठी’च्या कट्ट्यावर जयवंत दळवींच्या आठवणींचा जागर

‘घुंगुरकाठी’च्या कट्ट्यावर जयवंत दळवींच्या आठवणींचा जागर

जयवंत दळवींच्या आठवणी, चित्रफिती, अभिवाचन, साहित्यावर चर्चा अशा उपक्रमांनी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील ‘घुंगुरकाठी’ संस्थेने ‘दळवी कट्ट्या’वर जयवंत दळवींच्या आठवणींचा जागर केला. ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात या वर्षी 14 ऑगस्टला झाली. यानिमित्ताने काही तरी कार्यक्रम करावा, अशी कल्पना सुचल्यानंतर ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत व उपाध्यक्ष डॉ. सई लळीत यांनी ‘दळवी कट्ट्या’च्या रूपाने प्रत्यक्षात आणली.

दळवींचे पुतणे पुरुषोत्तम ऊर्फ सचिन दळवी यांनी जयाकाकांच्या आठवणी सांगून रसिकांना खिळवून टाकले. याबरोबरच दळवींच्या अनेक पुस्तकांतील प्रकरणांचे अभिवाचन, दळवींबद्दल पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या भाषणांच्या चित्रफिती, दळवींच्या साहित्यावर आणि एकंदर साहित्य व्यवहारावर मुक्त चर्चा असे कार्यक्रमाचे अनौपचारिक स्वरूप होते.

सतीश लळीत यांनी ‘अलाणे फलाणे’मधील एक प्रकरण सादर केले. डॉ. सई लळीत यांनी ‘सारे प्रवासी घडीचे’मधील शांतू न्हावी सादर केला. पी. एल. कदम यांनी दळवींनी नाट्य चळवळीबद्दल एका लेखात मांडलेले विचार वाचून दाखवले. अॅड. देवदत्त परुळेकर, मंगल परुळेकर, प्रा. विजय फातर्पेकर, पद्मा फातर्पेकर, अॅड. नकुल पार्सेकर, लेखिका वृंदा कांबळी, पुरुषोत्तम कदम, विनय सौदागर, अभिनेते श्याम नाडकर्णी, नीतिन वाळके, आडाळीचे सरपंच पराग गावकर, पित्रे आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘घुंगुरकाठी’ संस्थेने आडाळी येथे आयोजित केलेल्या दळवी कट्टा कार्यक्रमात दळवींच्या स्नुषा उर्मी दळवी यांचा सत्कार डॉ. सई लळीत यांनी केला. यावेळी सतीश लळीत व जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बंडखोरांवर कारवाई, महेश गायकवाडांची हकालपट्टी, सदा सरवणकरांवर कारवाई होणार? बंडखोरांवर कारवाई, महेश गायकवाडांची हकालपट्टी, सदा सरवणकरांवर कारवाई होणार?
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पण युती आणि आघाड्यांच्या जागावाटपात तिकीट न मिळाल्याने काही नेते नाराज आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी...
निवडणुकीच्या धामधूमीत आता ‘वर्गमंत्री’ निवडणुकीचा कल्ला; पहा ट्रेलर
लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
निम्रतसोबत अफेअरच्या चर्चांवर अभिषेक का गप्प? बच्चन कुटुंबीय नाराज, करणार कायदेशीर कारवाई
कर्जतमध्ये लाडक्या बहिणींच्या हाती शिवबंधन, नांदगाव, खांडस, फातिमानगरमध्ये इनकमिंग
प्रा. वामन केंद्रे यांची ‘अभिनयाची जादू’ कार्यशाळा
पोलीस डायरी – नामुष्की!