घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; विरोध करताच पट्ट्याने केली मारहाण, व्हिडीओही केला व्हायरलं
बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. अल्पवयीन मुली बलात्काराच्या शिकार ठरत आहेत. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीने विरोध केला असता नराधमाने पीडितेला पट्ट्याने मारहाण केली. तसेच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पीडित मुलगी आपल्या आईला मदत म्हणून घरकाम करत होती. सेओहारा परिसरातील एका घरामध्ये ती रोज साप सफाई करण्यासाठी जात होती. 10 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ती घरकाम करण्यासाठी पोहचली. यावेळी घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत घरमालकाचा मुलगा अदनान याने शेजारी राहणाऱ्या मुलीची मदत घेतली आणि घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. सदर घटनेची कुठेही वाच्यता केल्यात वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.
वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडितेने घाबरुन कोणाला काहीही सांगितले नाही. नेहमीप्रमाणे ती कामावर पुन्हा जाऊ लागली. मात्र 19 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा घरी कोणी नसताना आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला तसेच पीडितेला पट्ट्याने बेदम मारहाण केली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या आईला घटनेची माहिती झाली. त्यानंतर आरोपी अदनानविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List