पाणी उकळून, गाळून प्या! पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी
भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 3 ते 4 दिवसांमध्ये झालेल्या धुवाधार पावसामुळे 21 ऑक्टोबरपासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जल अभियंता खात्याकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र खबरदारी म्हणून मुंबईकरांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना सात जलस्रोतांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या जलस्रोतांपैकी भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गत 3 ते 4 दिवसांत जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी, नदीपात्रातून येणाऱया पाण्याची गढूळता 21 ऑक्टोबर 2024 पासून वाढली आहे, असे निदर्शनास आले आहे. यातच मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List