भातसा जलाशय क्षेत्रातील पावसामुळे मुंबईला गढूळ पाण्याचा पुरवठा, पालिकेने मुंबईकरांना केले पाणी गाळून प्यायचे आवाहन

भातसा जलाशय क्षेत्रातील पावसामुळे मुंबईला गढूळ पाण्याचा पुरवठा, पालिकेने मुंबईकरांना केले पाणी गाळून प्यायचे आवाहन

भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात मागील 3 ते 4 दिवसांमध्‍ये सातत्‍याने पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे दिनांक 21 ऑक्‍टोबर 2024 पासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गढूळता कमी करण्यासाठी महानगरपालिका जल अभियंता विभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. तथापि, खबरदारीचा उपाय म्‍हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्‍यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना सात जलस्रोतांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या जलस्रोतांपैकी भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात गत 3 ते 4 दिवसात जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी, नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याची गढूळता 21 ऑक्टोबर पासून वाढली आहे, असे निदर्शनास आले आहे.

मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत. पाण्‍यातील गढूळता कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्‍या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरीनचा देखील पुरेसा वापर केला जात आहे.

या बाबी लक्षात घेता, नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. गढूळ पाणी प्राप्‍त झाल्‍यास खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अमिताभ बच्चन असं होऊ देणार नाही…’, ऐश्वर्या – अभिषेक  यांचा होणार घटस्फोट? मोठी माहिती समोर ‘अमिताभ बच्चन असं होऊ देणार नाही…’, ऐश्वर्या – अभिषेक यांचा होणार घटस्फोट? मोठी माहिती समोर
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री अभिषेक बच्चन यांच्या खासगी आयुष्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सांगायचं झालं तर, मुकेश...
… तर रोहित स्वत:च कसोटीतून निवृत्ती पत्करेल! कृष्णम्माचारी श्रीकांत यांचे भाकीत
लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने सलमान खानला पुन्हा धमकी; आठवड्यात पाच धमकीचे संदेश
भिवंडी ग्रामीणचे उमेदवार महादेव घाटाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ; उद्धव ठाकरे यांची आज अंबाडीत दणदणीत सभा
वार्तापत्र – नाशिक मध्य, पश्चिम, देवळालीत शिवसेनेची विजयाकडे वाटचाल
महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग
आज मुंबईत महाविकास आघाडीची दणदणीत सभा! राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोफा धडाडणार