एकता कपूर आणि तिच्या आईच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, पोलिसांकडून…
एकता कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. एकता कपूरला टीव्हीची क्वीन देखील म्हटले जाते. एकता कपूर ही अत्यंत मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. एकता कपूरने आतापर्यंत अनेक हीट मालिका दिल्या आहेत. हेच नाही तर चित्रपटानंतर तिने आपला मोर्चा हा वेब सीरिजकडे देखील वळवलाय. मात्र, सध्या एकता कपूर हिच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. फक्त एकता कपूरच नाही तर तिच्या आईच्याही अडचणीत वाढ झालीये. आज मुंबई पोलिसांकडून एकता कपूर हिच्यासोबतच तिच्या आईची देखील चाैकशी करण्यात आलीये.
मुंबई पोलिसांनी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांची चौकशी केली आहे. ALT बालाजीच्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या एका एपिसोडमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असलेली अनुचित दृश्ये दाखवल्याप्रकरणी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकता कपूर आणि तिच्या आईला शिक्षा देखील होऊ शकते.
मुंबई पोलिसांनी एकता कपूर, शोभा कपूर आणि ऑल्ट बालाजी कंपनीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकता कपूरच्या अंधेरी स्थित कार्यालयामध्ये ही चौकशी करण्यात आली. यावेळी एकता कपूरची आई देखील उपस्थित होती. हेच नाही तर पुढील चाैकशी या प्रकरणातील 24 ऑक्टोबरला होणार आहे.
POCSO हा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी 2012 मध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत गुन्हेगारांवर कडक कारवाई देखील केली जाते. 18 वर्षांखालील मुले आणि मुली यांच्यावर लैगिंक अत्याचार किंवा त्यांचं शोषण केल्यास हा गुन्हा दाखल होतो. तोच गुन्हा एकता कपूर आणि तिच्या आईवर दाखल करण्यात आलाय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List