पावणे दोन कोटी घेऊन फसवले दोघांविरोधात गुन्हा दाखल

पावणे दोन कोटी घेऊन फसवले दोघांविरोधात गुन्हा दाखल

वाशी नाका येथील ज्वेलर्सचे दुकान विकण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एकाला एक कोटी 79 लाख रुपये घेऊन फसविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन भारसाकडे (37) हे फरसाण विक्रेते असून त्यांनी वाशी नाका येथील हिरा ज्वेलर्स नं. 6 व 7 हे विकत घेणार होते. यासाठी अश्विन जैन (42) आणि कविता रुपारेल (40) यांना एक कोटी 92 लाख रुपये रोखीने, आरटीजीएस तसेच धनादेशाद्वारे दिले.

दरम्यान इतके पैसे घेतल्यानंतर दोघांनी नितीन यांना दुकानाचा ताबा दिला नाही. त्यामुळे नितीन यांनी पैशांची मागणी केली असता दोघांनी त्यांना 13 लाख रुपये दिले. पण उर्वरित रक्कम न देता नितीन यांची फसवणूक केली. त्यामुळे नितीन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जैन आणि रुपारेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीची काल रात्री बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर 2024
कोलकातामधील महिला डॉक्टरची निर्घृण हत्या- आरोपी संदीप घोषला मृत्युदंडाची शिक्षा अटळ, विशेष न्यायालयाने नोंदवले निरीक्षण; जामीन फेटाळला
मुंबई विभाग क्र. 12 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
ऑक्टोबर महिन्यात  सुट्ट्याच सुट्ट्या
अफगाणिस्तानात महिलांसोबत भेदभाव नाही, तालिबानने हॉलिवूड अभिनेत्रीचा दावा फेटाळला
हिजबुल्लाच्या म्होरक्याचा खात्मा!