माझे भाग्य ! ट्रेन, बस, कार आणि विमान अपघातात वाचलो, नंतर लॉटरी जिंकलो

माझे भाग्य ! ट्रेन, बस, कार आणि विमान अपघातात वाचलो, नंतर लॉटरी जिंकलो

क्रोएशियाई फ्रैन सेलाक हा जगातील सर्वांत भाग्यशाली वृद्ध म्हणून ओळखला जातो. हे एकायला जरा चित्रपटाच्या स्क्रिप्टसारखं वाटेल की, तो अनेक अपघातात वाचला मग लॉटरी जिंकला. एखाद्या चित्रपटात शोभतील अशाच घटना सेलाकसोबत घडल्या आहेत. अनेक अपघातातून ते बचावले आणि नंतर लॉटरी जिंकले. त्यामुळे जगातील सर्वात भाग्यशाली वृद्ध म्हणून त्यांना ओळखले जाते.

काही लोकांचे नशीबही इतके चांगले असते की संकटातही त्यांच्या आयुष्यात चांगल्या घटना घडतात. काही वेळा अशा घटना चमत्कार वाटतात. अशाच घटना एका व्यक्तीसोबत घडल्या आहेत. म्हणून त्याला जगातील सर्वात भाग्यवान वृद्ध अशी ओळख मिळाली आहे. क्रोएशियाई फ्रैन सेलाक हा जगातील सर्वांत भाग्यशाली वृद्ध म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सोबत जे घडल ते एका चित्रपचाच्या स्क्रिप्टसारखचं आहे. यातील अनेक घटना अविश्वसनीय आहेत. त्यांचे जीवन आश्चर्यकारक असून अनेक संकटे त्यात आहे. सेलाक यांचा जन्म 1929 मध्ये क्रोएशियात झाला. संगीत शिक्षक म्हणून त्यांचे जीवन सर्वसामान्यांसारखे सुरू होते. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे अपघात घडले.

फ्रॅनो सेलाक म्हणतात की त्यांची बस नदीत पडली, तेव्हा 1957 मध्ये मृत्यूशी त्यांचा लपंडाव सुरू झाला. या अपघातानंतर त्यांना आणखी सहा वेळा मृत्यूला सामोरे जावे लागले. एकदा त्यांची ट्रेन रुळावरून घसरली आणि नदीत पडली पण ते बचावले. यानंतर दोनदा अपघातग्रस्त गाड्यांच्या स्फोटापासून ते बचावले. तसेच एकदा त्यांचे विमान कोसळले आणि ते गवताच्या ढिगाऱ्यावर पडल्यामुळे बचावले.

या घटनांमुळे त्यांना जगातील सर्वात भाग्यवान माणूस मानले जात होते. मात्र, 2000 या वर्षात सेलोनला लॉटरीमध्ये सुमारे 1 दशलक्ष डॉलर्स मिळाले. त्यांनी मिळालेले पैसे मित्र आणि कुटुंबियांना दिले. राहिलेल्या पैशांत त्याने एक आलिशान घर घेतले, मात्र, ते घऱ त्यांनी 2010 मध्ये विकले. आता ते आपल्या पाचव्या पत्नीसह सर्वसामान्य जीवन जगत आहेत. मात्र, आयुष्यात अनेक अपघातातून बचावत मृत्यूशी पाठशिवणीचा खेळ करत लॉरी जिंकूनही तो सर्वसामान्य जीवन जगत आहे. म्हणूनच त्यांना सर्वाधिक भाग्यशाली वृद्ध अशी ओळख मिळाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय? कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय?
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदावरून भुवया उंचावणारं विधान केलं आहे. फिरता मुख्यमंत्री कधी ऐकलं नाही. फिरता चषक ऐकला...
काँग्रेसच्या काळातील योजना खड्ड्यात घालण्यासाठी होत्या का?; राज ठाकरे यांना कुणी केला सवाल?
धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी सत्ताधारी आमदारच आंदोलन करणार; सरकारची डोकेदुखी वाढली
‘कोई मिल गया’ सिनेमानंतर रजत बेदीने अचानक का सोडलं बॉलिवूड आणि देश?
मौनी रॉय हिचा लाल बिकिनीमध्ये जलवा, अभिनेत्री थेट मालदीवमध्ये आणि…
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यावर भिडेच्या लेकीचा गंभीर आरोप
सैफ अली खान याचा पहिल्यांदाच करीना कपूर हिच्याबद्दल ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेता थेट म्हणाला…