दुर्दैवी! पाण्यात कार बुडाल्याने बँक मॅनेजरसह कॅशियरचा करुण अंत

दुर्दैवी! पाण्यात कार बुडाल्याने बँक मॅनेजरसह कॅशियरचा करुण अंत

हरियाणात फरीदाबादमधील रेल्वे पुलाखाली पाण्यात एक कार बुडाली आणि कारमध्ये उपस्थित बँक मॅनेजर आणि कॅशियरचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

हरियाणातील फरीदाबादला पावसाने चांगलेच झोडपले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून फरीदाबादमधील रेल्वे अंडर ब्रीज परिसरात सुद्धा पाणी साचले होते. याच मार्गावरून प्रवास करत असताना शॉर्टकर्ट मारण्याच्या नादात HDFC बॅंकेचे मॅनेजर पुण्य श्रेय शर्मा आणि कॅशियर विराज द्विवेदी यांची XUV700 ही कार पाण्यात बुडाली. कार पाण्यात जाताच लॉक झाल्यामुळे, त्यांना कारमधून बाहेर पडणे शक्य झाले नाही. पाण्याची पातळी साधारण 10 फुटांच्या आसपास असल्यामुळे कार पाण्यामधून बाहेर काढणे दोघांनाही शक्य झाले नाही आणि बुडून दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार हरपल्याने दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मास्टरस्ट्रोक, उमेदावारांसह-पक्षाची डोकेदुखी वाढली, नक्की निर्णय काय? Maharashtra Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मास्टरस्ट्रोक, उमेदावारांसह-पक्षाची डोकेदुखी वाढली, नक्की निर्णय काय?
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबाबतची चर्चा अखेरच्या टप्प्यात आहे. तर काही जागांवरुन घोडं...
maharashtra assembly election date 2024: महाराष्ट्रात निवडणुका एका टप्प्यात होणार का? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितले
कल्याण, कुर्ला, कोलाबा या ठिकाणी सर्वात कमी मतदान, निवडणूक आयोगाने काय म्हटलं
Maharashtra Election 2024 : महाराष्ट्राच्या महानिवडणुकीची काय तयारी; कधी होतील तारखा घोषीत, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले नव्हते, आता काय होणार… निवडणूक आयुक्त म्हणाले….
ऐश्वर्या रायने IIFA च्या व्यासपीठावर या व्यक्तीचे धरले पाय, बच्चन कुटुंबातील…
सैफ अली खान याच्याकडून अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, माझ्या…