परीक्षण- लखलखीत रंगशैली

परीक्षण- लखलखीत रंगशैली

>> अश्विनी कुलकर्णी

आपण आपले प्रतिबिंब आरशात नेहमीच पाहतो. काय बघतो, तर तेच ते तथाकथित आपले कान, नाक, डोळे इत्यादी. याच्या पलीकडे ही ‘अजून’ काही असतं? हा प्रश्नच थोडा वेगळा वाटतो, बुचकळ्यात टाकतो. तसं ‘अजून’ काय असतं बघण्यात?

हा प्रश्न असाच मनात घोळवत राहिला तर एखाद्या गाफील क्षणी… कधीतरी काहीतरी लुकलुकतं, गवसतं, दिसतं, शांत तळ्यातलं त्याचं प्रतिबिंब. काळाच्या पडद्याआड गेलेला ‘तो.’ सुप्रसिद्ध डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग!

चेहऱयात ‘अजून’ काय असतं, या ‘अजून’ची उत्तरे आहेत त्याच्यापाशी. त्याने ती दिली आहेत. त्याच्या अभिव्यक्तीतून, त्याच्या शैलीतून, त्याच्या रंग-लेपणाच्या नाटकीय फटकाऱयातून. बाळासाहेबांना व्हिन्सेंट गॉग खूप आवडायचा. ते म्हणायचे, ‘जर मी व्यंगचित्रकारिता केली नसती, तर व्हिन्सेंट शैलीत भरदार फटकारे देत चित्रे रंगवली असती.’

याच कल्पनेतून महेंद्र पंडित यांनी व्हिन्सेंट गॉग आणि बाळासाहेब यांचा हा चित्रमेळ घातला. ‘व्हिन्सेंटच्या शैलीतून बाळासाहेब’ ही थीम घेऊन बाळासाहेबांचे विविध मूडस् त्यांनी कॅनव्हासवर चितारले. ऑइल पेण्टस्, ऑइल पेस्टल, पेन्सिल, नाईफ अशा विविध माध्यमांतून साकारलेला हा रंगमेळा. यातील काही चित्रे संकलित करून तयार झालेले हे चित्र-पुस्तक ‘REFLECTION’ (Artistic journey with Master).

व्हिन्सेंटला समस्त कलाकारांचा एक समुदाय स्थापन करायचा होता. पण त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. जुन्या वळणाच्या शिष्टमान्य चित्र पध्दती व्हिन्सेंटने झुगारून दिल्या. त्याला भावली तशीच त्याने चित्रे काढली. त्याला चित्रे विकायची नव्हती. कोळशाच्या खाणीत राहून त्याने चित्रे काढली. पैशाची सतत विवंचना, पोटात प्रचंड भूक आणि हातात कुंचला अशा अवस्थेत तो जगला आणि त्याच्या शैलीतच त्याने जगाचा निरोप घेतला.

व्हिन्सेंटच्या प्रभाववादी शैलीतले पाईप ओढणारे बाळासाहेब, भगव्या पोषाखातले बाळासाहेब, सूर्यफुलांच्या शेतातले आत्ममग्न बाळासाहेब खूपच हटके वाटतात. लहान लहान फटक्यांत, लखलखीत रंगशैलीत बाळासाहेबांची भावावस्था यथार्थपणे प्रतिबिंबित होते. पुस्तकातील तिसऱया पानावरील गद्यकाव्यात महेंद्र पंडित यांनी ‘अमूर्तते’ला नेमक्या शब्दात सादर केलेले आहे.

कधी त्याला काही बरळण्याची उबळ येते

तेव्हा रात्री तारका मंडपाखाली

तो चित्र थपथपवतो

गहन मौनाच्या ठणक्यात!

तो प्रत्येकातून ओघळत असतो

अभिव्यक्तीत भिन्नता जपत

त्याने मरून(च) दाखविलं

प्रति आव्हान देत प्रत्येकाला

तुम्ही जमलं तर, कुवतीनुसार

जगून दाखवा

तथाकथित पूर्ण विरामात!

महेंद्र पंडित व्यंगचित्रकार आहेत. पण प्रत्येक चित्रात त्यांच्यातला कार्टुनिस्ट तसूभरही डोकावला नाही हे विशेष!  रंग-रेषाशैलीही आकर्षक आहे. तिचा वेगवानपणा (विशेषत चित्राच्या पार्श्वभूमीवर) प्रखरपणे दिसतो. ‘बाळासाहेब ठाकरे’ या नावाभोवतीचा ‘झंझावात’ प्रकट होतो.

महेंद्र पंडित यांनी यापूर्वी बाळासाहेब यांच्यावर ‘व्यंगचित्र-चरित्र’ (Wow Thackeray) केलेले आहे. त्यानंतरची ही वेगळी कलात्मक उडी -REFLECTION. व्यापक कला विचारांची उंची दाखविणारी आहे. सदर पुस्तक व्हिन्सेंट गॉगच्या म्युझियमसाठीही खास मागवले आहे, त्यासाठी महेंद्र पंडित यांचे अभिनंदन.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीची काल रात्री बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर 2024
कोलकातामधील महिला डॉक्टरची निर्घृण हत्या- आरोपी संदीप घोषला मृत्युदंडाची शिक्षा अटळ, विशेष न्यायालयाने नोंदवले निरीक्षण; जामीन फेटाळला
मुंबई विभाग क्र. 12 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
ऑक्टोबर महिन्यात  सुट्ट्याच सुट्ट्या
अफगाणिस्तानात महिलांसोबत भेदभाव नाही, तालिबानने हॉलिवूड अभिनेत्रीचा दावा फेटाळला
हिजबुल्लाच्या म्होरक्याचा खात्मा!